कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध पदांवर भरती, 22 ते 85 हजारांपर्यंत पगाराची संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगली संधी निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं विविध पदांच्या 26 जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध पदांवर भरती, 22 ते 85 हजारांपर्यंत पगाराची संधी
job
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 6:02 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगली संधी निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं विविध पदांच्या 26 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून या संदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पदांसाठी ऑफलाईन अर्ज करायचे असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्रप्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी मुलाखतींद्वारे उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदासाठी 1 जागा, केंद्रप्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक 1 जागा वरिष्ठ तंत्रज्ञ 12 जागा आणि कनिष्ठ तंत्रज्ञ 11 जागांवर भरती करण्यात येणार आहे. या जागा कंत्राटी तत्त्वावर भरल्या जाणार आहेत.

मानधन

1) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ: 85 हजार 2) केंद्रप्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक : 35 हजार 3) वरिष्ठ तंत्रज्ञ: 30 हजार 4) कनिष्ठ तंत्रज्ञ: 22500

शैक्षणिक पात्रता

1) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ: एमडी मायक्रो, एमडी पॅथोलॉजी 2) केंद्रप्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक : एम.एससी/बी.एससी 3) वरिष्ठ तंत्रज्ञ: बी.एससी, डीएमलटी 4) कनिष्ठ तंत्रज्ञ: बी.एससी, डीएमलटी

थेट मुलाखतीद्वारे निवड

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना चाचणीची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. महापालिकेकडून सुरु करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी उमेदवारांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे. 30 सप्टेंबर रोजी महापालिका कार्यालयात मुलाखतींचं आयोजन करण्यात येणार आहे. मुलाखतींमधून उमेदवारांची निवड केली जाईल.

यूपीएससीतर्फे 439 पदांवर भरती परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि जिओ सायंटिस्ट प्रीलिम्स परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. जे पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते यूपीएससीच्या upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे 247 जागा आणि जिओ सायंटिस्टसाठी 192 जागांवर भरती होणार आहे.

महत्वाच्या तारखा

यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाला आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 6:00 पर्यंत वेळ दिला जाईल. अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीखही तीच असेल.

जिओ सांयटिस्ट परीक्षा 20 फेब्रुवारीला

जिओ सायंटिस्टसाठी प्रीलिम्स परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल तर अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षेपूर्वी आयोगाकडून प्रवेशपत्र दिले जातील. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे.

इतर बातम्या :

SBI Clerk Result 2021 : स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेची प्रवेशपत्र जारी

रेल्वे मंत्रालयाचा मेगा प्लॅन, 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार, रेल्वे कौशल्य विकास योजनेला सुरुवात

Kalyan Dombivali Municipal Corporation invite application for various post on contract level check details here

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.