Kargil Vijay Diwas Special: कारगील युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलं, शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जीवन प्रवास माहिती आहे का?

26 जुलै रोजी कारगिलच्या युद्धाला 22 वर्षे पूर्ण होत आहे. कारगिल युद्ध आणि त्यामध्ये भारतीय सैन्यानं दाखवलेल्या शौर्यानं प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटतं.

Kargil Vijay Diwas Special: कारगील युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलं, शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जीवन प्रवास माहिती आहे का?
कॅप्टन विक्रम बत्रा
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 6:45 PM

Kargil Vijay Diwas Special नवी दिल्ली : 26 जुलै रोजी कारगिलच्या युद्धाला 22 वर्षे पूर्ण होत आहे. कारगिल युद्ध आणि त्यामध्ये भारतीय सैन्यानं दाखवलेल्या शौर्यानं प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटतं.कारगिल युद्धामधील भारतीय सैनिकांचे धैर्य आणि शौर्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी असतं. जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाची चर्चा होते तेव्हा परमवीर चक्र विजेता शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्य गाथा नक्कीच आठवते.

विक्रम बत्रा यांचं शौर्य प्रेरणादायी

वयाच्या 24 व्या वर्षी कॅप्टन विक्रम बत्राने भारतासाठी शौर्याचे उदाहरण ठेवले. कॅप्टन बत्रा हे सर्व वयोगटातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी भारतीय सैन्याचं सर्वोच्च नेतृत्व केले. बत्रा यांनी देशासाठी स्वत: चं बलिदान दिले. परमवीर चक्र विजेता शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा विद्यार्थी म्हणून कसा जीवन प्रवास होता ते जाणून घेणं आवश्यक आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे झाला. गिरधारी लाल बत्रा हे त्यांचे वडिल आणि कमल बत्रा या त्यांच्या आई आहेत. विक्रम बत्रा याचे वडील गिरधारी लाल बत्रा हे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक होते, तर आई शाळेची शिक्षिका होती. पालकांचे शिक्षक असल्याचा परिणाम विक्रम बत्रा यांच्या जीवनावर दिसून आला. विक्रम बत्रा हे सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध विद्यार्थी होते.

खेळात रस

कॅप्टन विक्रम बत्रा यांनी पालमपूरमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला.1990 मध्ये त्यांनी आपल्या भावासोबत ऑल इंडिया केव्हीएस नेशन्स टेबल टेनिसमधील शाळेचे प्रतिनिधित्व केले. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कराटेमध्ये ग्रीन बेल्ट मिळवला होता आणि मनालीतील राष्ट्रीय स्तरावरील खेळांच्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.

विक्रम बत्रा हे महाविद्यालयीन काळात एनसीसी, एअर विंगमध्ये सहभागी झाले झाले. कॅप्टन विक्रम बत्रा यांची एनसीसी एअर विंग युनिटसह पिंजोर एअरफील्ड आणि फ्लाइंग क्लब येथे 40 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. कॅप्टन विक्रम बत्रांनी एनसीसीचं ‘सी’ प्रमाणपत्र देखील मिळवलं होतं. एनससीसीमध्येच त्यांना कॅप्टन पद मिळालं होतं.

इंडियन मिल्ट्री अकॅडमीत निवड झाल्यानंतर महाविद्यालय सोडलं

विक्रम बत्रा यांची 1996 मध्ये भारतीय सैन्य अकादमीत (आयएमए) निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी महाविद्यालय सोडत ते डेहराडूनला गेले. 6 डिसेंबर 1997 रोजी त्यांनी 19 महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आयएमएमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांना जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या 13 व्या बटालियनमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले. जानेवारी 1999. मध्ये त्यांना कर्नाटकच्या बेळगाव येथे दोन महिन्यांचा कमांडो कोर्स पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात आले. कमांडो कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांना सर्वोच्च श्रेणीतीलं इन्स्ट्रक्टरचा ग्रेड देण्यात आली.

कारगिल युद्धादरम्यान शहीद होण्यापूर्वी 1999 साली होळीच्या उत्सवा दरम्यान ते सुट्टीवर गेले होते. भारतीय सैन्य दलानं 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात विजय मिळवला. कारगिल युद्धादरम्यान कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याची गोष्ट लवकरच शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहे.

इतर बातम्या

Corona Vaccine: कोरोनाच्या नव्या विषाणूंना मात देण्यासाठी बूस्टर डोसची गरज : AIIMS संचालक डॉ रणदीप गुलेरिया

Mann Ki Baat: देशाच्या प्रत्येक नागरिकानं भारत जोडो आंदोलनाचं नेतृत्व करावं : नरेंद्र मोदी

Kargil Vijay Diwas Special story of Kargil Hero Captain Vikram Batra know about him

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.