UPSC 2021: “जो लड़ सका है वो ही तो महान है…”10 वेळा यूपीएससी देतो, फेल होतो, धाडसी असतो म्हणून व्यक्त होतो! गोष्ट एका धाडसाची
अशी माणसं स्वतः मध्येच एक उत्तम उदाहरण असतात. हताश होऊन लागलीच व्यक्त केलेली भावना असते ही, अशा व्यक्तीला सल्ले देण्यासाठी आपली गरज नसते. पण खंबीर माणूस, प्रचंड मेहनती असलेला माणूस सुद्धा एक ना एक दिवस थकतो आणि आता पुढे काय करावं असा त्याला प्रश्न पडतो. तरी बरं आता सोशल मीडियाचा ऑप्शन आहे, माणूस त्यावर व्यक्त होऊ शकतो.
10 प्रयत्न, 6 मुख्य परीक्षा आणि 4 मुलाखती! हा प्रयत्न नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती यूपीएससीच्या निकालानंतर (UPSC 2021 Final Result) फेल (UPSC Fail) झाल्याचं ट्विट करतो. हताश होतो, तेव्हा तुम्ही त्याला काय सांगाल? बरं प्रयत्न साधासुधा नाही. दहा वेळा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात चार वेळा मुलाखत देऊन परत आलेला व्यक्ती. अशी माणसं स्वतः मध्येच एक उत्तम उदाहरण असतात. हताश होऊन लागलीच व्यक्त केलेली भावना असते ही, अशा व्यक्तीला सल्ले देण्यासाठी आपली गरज नसते. पण खंबीर माणूस, प्रचंड मेहनती असलेला माणूस सुद्धा एक ना एक दिवस थकतो आणि आता पुढे काय करावं असा त्याला प्रश्न पडतो. तरी बरं आता सोशल मीडियाचा ऑप्शन आहे, माणूस त्यावर व्यक्त होऊ शकतो. यूपीएससीचा 30 मे 2022 ला निकाल लागला आणि देशभरात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं. कौतुक सोहळे अजूनही चालूच आहेत. निवड झालेले विद्यार्थी अर्थातच खुश आहेत. पण निवड न झालेल्यांचं काय? ते काय करतायत? कुठे आहेत? अशीच एक व्यक्ती आहे जिने निकालानंतर एक ट्विट केलं. आलेला निकाल पाहिला, त्यात आपलं नाव त्याला दिसलं नाही आणि मग त्याने ट्विट टाकून व्यक्त व्हायचं धाडस केलं आणि त्या ट्विट खाली मोटिव्हेशनल कमेंट्सचा (Motivational Comments) पाऊस पडला.
कुणाल विरुलकर ट्विट
कुणाल विरुलकर नावाच्या युजरने निकालानंतर एक ट्विट शेअर केलं. इतक्यांदा प्रयत्न करूनही आपण अपयशी झालोय, भविष्यात काय लिहिलं आहे काही समजत नाही अशा आशयाचं ते ट्विट होतं. “10 प्रयत्न, 6 मेन्स, 4 मुलाखती आणि तरीही सिलेक्शन नाही. माहित नाही नशिबात काय लिहीलं आहे.”
10 attempts 6 mains 4 interview Still couldn’t get selected in UPSC
Don’t know what is written in the destiny. #UPSC
— Kunal Virulkar (@kunalrv) May 30, 2022
“माघार घेऊ नका, नक्कीच काहीतरी छान होईल”
कुणाल विरुलकर यांनी हे ट्विट टाकताच लोकांनी त्यांना माघार न घ्यायचा सल्ला दिलाय. हजारो लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीये. इतकंच काय तर आयपीएस दिपांशु काबरा यांनी देखील प्रतिक्रिया दिलीये ज्यात त्यांनी ,”काळजी करू नका तुमच्या नशिबात कदाचित अजून काही असेल, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल” असं लिहिलंय. प्रत्यक्षात हे अपयश पचवण्याचं धाडस त्या व्यक्तीत इतक्या प्रयत्नांनंतर असेलच असं नाही पण यूपीएससीच्या प्रोसेसवर विश्वास ठेवायला हरकत नाही. यूपीएससी अधिकारी घडवते, आणि चांगला अधिकारी घडण्याआधी त्या अधिकाऱ्याला अशा सर्व गोष्टीतून जाणं भाग आहे. सगळ्या कमेंट्स मधून लोकं सातत्याने एक गोष्ट मात्र नक्की सांगतायत,”माघार घेऊ नका, नक्कीच काहीतरी छान होईल.”