एमपीएससी परीक्षार्थी व कर्मचाऱ्यांना परीक्षा लोकल प्रवासाची मुभा द्या; राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला पत्र

परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.

एमपीएससी परीक्षार्थी व कर्मचाऱ्यांना परीक्षा लोकल प्रवासाची मुभा द्या; राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला पत्र
एमपीएससी
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 5:30 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करणार आहेत. त्यांना 30 व 31 ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षा घेण्यासाठी लोकाल रेलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असे राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (Letter from the State Government to the Railway Department about allow local travel to MPSC student)

तसेच ‘एम एस इनोव्हेटिव्हवी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ हे ही एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असल्याने त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरीता प्रवास करण्याची मुभा द्यावी तसेच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी असे पत्रात सविस्तरपणे लिहिले आहे.

एमपीएससीकडून PSI, कक्ष अधिकारी, कर निरीक्षकच्या 666 पदांसाठी जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. एमपीएससीनं आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

भारतीय नौदलात 300 जागांसाठी भरती

इंडियन नेव्ही मॅट्रिक रिक्रूट स्कीम अंतर्गत 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांवर भरतीसाठी भारतीय नौदलाने अर्ज जारी केले असून आजपासून अर्ज भरण्यात येत आहेत. नौदलाने ज्या तीन पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यात कुक, कारभारी आणि सफाई कामगार या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

1500 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा

भारतीय नौदलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या 300 रिक्त पदांची राज्यवार विभागणी करण्यात आली आहे. अर्ज केलेल्या एकूण उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारावर 1500 उमेदवारांची निवड केली जाईल. या 1500 उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक योग्यता चाचणीला सामोरे जावे लागेल. भारतीय नौदलाच्या भर्ती संचालनालयाने स्पष्ट केले आहे की लेखी परीक्षेला बसण्यासाठी पात्रता कट ऑफ गुण वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असणार आहेत. (Letter from the State Government to the Railway Department about allow local travel to MPSC student)

इतर बातम्या

BEL मध्ये 73 अप्रेंटिसपदांसाठी भरती, 10 नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

Indian Navy MR Recruitment 2021: भारतीय नौदलात 300 जागांसाठी भरती, आजपासून नोंदणीला सुरुवात

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.