LIC AAO Result 2021: एलआयसीकडून सहायक प्रशासकीय अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षा कधी?
भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं सहायक प्रशासकीय अधिकारी आणि सहायक अभियंता भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
LIC AAO Result 2021 नवी दिल्ली: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं सहायक प्रशासकीय अधिकारी आणि सहायक अभियंता भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एलआयसीची भरती परीक्षा दिलेली असेल ते अधिकृत वेबसाईट licindia.in ला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या परीक्षेद्वारे एकूण 218 पदांवर भरती होणार आहे.
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू झाली. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 मार्च 2021 पर्यंत वेळ देण्यात आला होता. कोरोना विषाणू संसर्गामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं उमेदवारांना परीक्षेसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. या रिक्त पदासाठी परीक्षा 28 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली. आता प्रीलिम्स परीक्षेचा निकाल (LIC AAO Pre Result 2021) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
निकाल कसा पाहायचा?
स्टेप 1 : निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट licindia.in ला भेट द्या. स्टेप 2 : वेबसाईटच्या होमपेजवर दिलेल्या करिअर लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : सहाय्यक अभियंता/ एए/ एएओ (विशेषज्ञ)- 2020 च्या भरतीच्या क्लिक करा. स्टेप 4 : RESULT OF PRELIMINARY EXAMINATION HELD ON 28.08.2021 FOR RECRUITMENT OF ASSISTANT ENGINEERS/AA/AAO (Specialist) च्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 5 : क्लिक केल्यावर निकालाची पोस्टनिहाय पीडीएफ फाइल मिळेल. स्टेप 6 : PDF मध्ये तुमच्या नावाच्या मदतीने निकाल चेक करा
मुख्य परीक्षेची प्रतीक्षा
प्रीलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता फेज 2 अर्थात मुख्य परीक्षेला बसणे आवश्यक आहे. एलआयसीने अद्याप मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. उमेदवारांनी अपडेट माहितीसाठी एलआयसीच्या वेबसाईटला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्य परीक्षेत 300 गुणांसाठी वस्तुनिष्ठ चाचणी आणि 25 गुणांसाठी वर्णनात्मक चाचणी असेल.
वस्तुनिष्ठ (MCQs) आणि वर्णनात्मक चाचण्या दोन्ही ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्या जातील. वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ असेल. त्याचबरोबर उमेदवारांना वर्णनात्मक चाचणीचे उत्तर संगणकावर टाइप करून द्यावे लागेल. मुख्य परीक्षेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीतून जावे लागेल. तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
इतर बातम्या:
Uddhav Thackeray | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार: उद्धव ठाकरे
धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द
PHOTO: नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला चौथा पूर
Marathwada rain : आधीच पावसानं धुतलं, त्यात जायकवाडीचे तब्बल 18 दरवाजे उघडले, मराठवाड्यात पूरस्थिती
LIC AAO result 2021 declared for assistant administrative officer and assistant engineer main exam dates declare soon