Lok Sabha Recruitment 2021 : लोकसभा सचिवालयात विविध पदांसाठी भरती, अर्ज कुठे करायचा?

लोकसभा सचिवालयात अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. यात प्रमुख सल्लागार, सोशल मीडिया मार्केटिंग (वरिष्ठ सल्लागार), सोशल मीडिया (कनिष्ठ सल्लागार), ग्राफिक डिझायनर, वरिष्ठ कंटेट रायटर (हिंदी), कनिष्ठ कंटेट (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ सहकारी) यांचा पदांचा समावेश आहे.

Lok Sabha Recruitment 2021 : लोकसभा सचिवालयात विविध पदांसाठी भरती, अर्ज कुठे करायचा?
लोकसभा
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 3:46 PM

Lok Sabha Secretariat Recruitment 2021 नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयात अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. यात प्रमुख सल्लागार, सोशल मीडिया मार्केटिंग (वरिष्ठ सल्लागार), सोशल मीडिया (कनिष्ठ सल्लागार), ग्राफिक डिझायनर, वरिष्ठ कंटेट रायटर (हिंदी), कनिष्ठ कंटेट (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ सहकारी) यांचा पदांचा समावेश आहे. येत्या 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.loksabha.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करु शकता.

एका वर्षासाठी नियुक्ती मिळणार

लोकसभा सचिवालयामध्ये सल्लागार पदासाठी करार तत्वावर भरती केली जाणार आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती देण्यात येणार आहे. उमेदवारांची कामगिरी चांगली असल्यास त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. कामगिरी समाधानकारक नसल्यास उमेदवारांना कोणतीही पूर्वसूचना न देता पदावरुन काढून टाकलं जाऊ शकतं.

लोकसभा सचिवालयमध्ये ‘या’ पदांसाठी भरती

लोकसभा सचिवालयने दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख सल्लागार, सोशल मीडिया मार्केटिंग (वरिष्ठ सल्लागार), सोशल मीडिया (कनिष्ठ सल्लागार), ग्राफिक डिझायनर, वरिष्ठ कंटेट रायटर (हिंदी), कनिष्ठ कंटेट रायटर (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ सहकारी) यांसह अनेक पदासांठी अर्ज मागवले आहेत.

यातील प्रत्येक पदासांठी पात्रता वेगवेगळी आहे. यातील काही पदांसाठी 12 वी पास असणारे व्यक्ती अर्ज करु शकता. तर काही पद ही पदवी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहे. या पात्रतेशी संबंधित माहितीसाठी उमेदवार अधिसूचना पाहू शकतात.

रिक्त पद

सोशल मीडिया मार्केटिंग (वरिष्ठ सल्लागार) – 01 पद सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ सल्लागार) – 01 पद वरिष्ठ कंटेंट रायटर / मीडिया विश्लेषक (हिंदी) – 01 पद कनिष्ठ कंटेंट (इंग्रजी) – 01 पद सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ सहकारी) – 05 इव्हेंट मॅनेजर -01 पद

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे 22 वर्षे ते 58 वर्षे इतके असावे. त्याचबरोबर कोट्यासाठी वयाची सवलत दिली आहे. इच्छूक उमेदवारांसाठी जारी केलेले अधिकृत नोटीफिकेशन पाहावे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. “पात्र उमेदवारांना मुलाखत मंडळासमोर वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, अधिकृत सूचनेनुसार एकदा निवडलेल्या अर्जदाराला नंतर आपली उमेदवारी मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याला त्याच्या पदाची जबाबदारी ताबडतोब स्वीकारावी लागेल. त्याच वेळी, या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

यूपीएससीतर्फे 439 पदांवर भरती परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि जिओ सायंटिस्ट प्रीलिम्स परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. जे पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते यूपीएससीच्या upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे 247 जागा आणि जिओ सायंटिस्टसाठी 192 जागांवर भरती होणार आहे.

महत्वाच्या तारखा यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाला आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 6:00 पर्यंत वेळ दिला जाईल. अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीखही तीच असेल.

इतर बातम्या:

SBI Clerk Result 2021 : स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेची प्रवेशपत्र जारी

रेल्वे मंत्रालयाचा मेगा प्लॅन, 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार, रेल्वे कौशल्य विकास योजनेला सुरुवात

Lok Sabha Recruitment 2021 vacancy in Lok Sabha Secretariat on Consultant and Content writer post

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.