Maharashtra Metro Recruitment 2021: महा मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने नागपूर रेल्वे प्रोजेक्टसाठी विविध पदावंर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. मेट्रोमधील नोकरीची संधी मिळवण्यासाठी उमेदवारांचं अभियांत्रिकीचं शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे.
Maharashtra Metro Recruitment 2021 मुंबई: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने नागपूर रेल्वे प्रोजेक्टसाठी विविध पदावंर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. मेट्रोमधील नोकरीची संधी मिळवण्यासाठी उमेदवारांचं अभियांत्रिकीचं शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे. मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदावर भरती केली जाणार आहे. या पदासांठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करवा लागणार आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 13 जुलै 2021 ही आहे.
किती पदांवर भरती
नागपूर रेल्वे प्रोजेक्टसाठी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरपदासाठी 18 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.
पात्रता
नागपूर मेट्रो प्रकल्पातील मॅनेजर आणि असिस्टंट मॅनजरपदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई आणि बी टेक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उमेदवारांना mahametro.org या वेबसाईटवर अर्जाचा नमुना प्राप्त होईल.
वयोमर्यादा
महाराष्ट्र मेट्रोने मॅनेजर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष आहे. तर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
पगार किती?
मॅनेजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 60 हजार ते 1.80 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. तर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी किमान वेतन 50 हजार ते 1.60 लाख रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार आहेत.
अर्ज कसा करणार?
महाराष्ट्र मेट्रोतील नागपूर मेट्रो प्रकल्पासाठीच्या पदासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्र मेट्रोच्या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन प्रिंट काढावी लागेल. त्यानंतर तो अर्ज भरुन योग्य कागदपत्रांसह तो अर्ज मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड, वीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदेशपथ, नागपूर, 440010 यापत्त्यावर पाठवावा लागेल.
आयबीपीएस क्लार्क 2021 भरतीसाठी अधिसूचना जारी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा https://t.co/aJnrfH8fDI @CMOMaharashtra @PMOIndia #IBPS #IBPSClark2021 #BankJobs
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
संबंधित बातम्या:
GAIL Recruitment 2021: गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये 220 सरकारी नोकर्या; 5 ऑगस्टपर्यंत करा ऑनलाईन अर्ज
Maha Metro Recruitment 2021 for Manager and Assistant manager post at Nagpur Metro Project