परीक्षा महाराष्ट्रासाठी, सेंटर उत्तर प्रदेश ! आरोग्य विभागाच्या भरती प्रकियेचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यांच्या प्रेवशपत्रांवर तसे नमूद करण्यात आहे. परीक्षा ही माहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र परिक्षार्थांनी परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेशातील मिळाले आहे.

परीक्षा महाराष्ट्रासाठी, सेंटर उत्तर प्रदेश ! आरोग्य विभागाच्या भरती प्रकियेचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 8:16 PM

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ संपण्याचे नाव घेत नाहीये. येत्या 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि ड संवर्गाची परीक्षा होणार आहे. मात्र, ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रेवशपत्रावर तसे नमूद करण्यात आहे. परीक्षा ही माहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र परिक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेशातील मिळाले आहे. सरकारच्या या अजब कारभारामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे. (maharashtra health department recruitment student got uttar pradesh exam center on his admit card)

विद्यार्थ्याला थेट उत्तर प्रदेशचे परीत्रा केंद्र 

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी 25 सप्टेंबर आणि गट ड संवर्गातील पदासाठी 26 सप्टेंबर 2021 रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांचे प्रवेशपत्रदेखील वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. मात्र दत्ता पतुरकर या परीक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेश राज्यातील मिळाले आहे. हा अजब प्रकार समोर आल्यामुळे परीक्षेआधी योग्य ते नियोजन करावे, तसेच माझी अडचण दूर करावी अशी मागणी दत्ता पतुरकरकडून केली जात आहे.

भूलथापांना बळी पडू नये

तर दुसरीकडे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. सह्याद्री विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ. साधना तायडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी यांना सूचना

राज्यातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष घालावे. परीक्षा जरी बाह्यस्त्रोताद्वारे घेतली जात असली तरीही सर्व जिल्हाधिकारी यांनीही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष द्यावे अशा सूचना टोपे यांनी दिल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये काही व्यक्ती परीक्षेबाबत गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पहावे, असेही टोपे यांनी पोलीस विभागाला सांगितले आहे.

उमेदवारांनी प्रलोभनास बळी पडू नये

उमेदवारांनी प्रामाणिकपणे अभ्यास करुनच परीक्षेस उपस्थित राहावे. कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. परीक्षेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभागामार्फत संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे, असे टोपे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आहे.

सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा

दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

इतर बातम्या :

‘दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल’, नाना पटोलेंचा खोचक टोला

संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला

Video | फूड डिलिव्हरी करणाऱ्या ड्रोनवर कावळ्याचा हल्ला, हवेतील युद्ध कॅमेऱ्यात कैद

(maharashtra health department recruitment student got uttar pradesh exam center on his admit card)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.