MPSC चा धडाका सुरुच, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, औषध निरीक्षक पदाच्या 87 जागांसाठी जाहिरात
अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, इतर 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
![MPSC चा धडाका सुरुच, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, औषध निरीक्षक पदाच्या 87 जागांसाठी जाहिरात MPSC चा धडाका सुरुच, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, औषध निरीक्षक पदाच्या 87 जागांसाठी जाहिरात](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/10/09023838/MPSC-EXAM-compressed.jpg?w=1280)
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली आहे. तर, अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, इतर 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, 1 डिसेंबरपर्यंत शुल्क जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. pic.twitter.com/yTNgHcWrex
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 17, 2021
औषध निरीक्षक 87 पदांसाठी भरती
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (255/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/bl5YUI6901
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 17, 2021
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील गृहपाल, गट-ब संवर्गातील एका पदावरील भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुख्य प्रशासकीय अधिकारी पदाच्या 4 जागांसाठी जाहिरात
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार व अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी संवर्गातील 4 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार व अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी संवर्गातील 4 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (250/2021 ते 253/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 17, 2021
इतर बातम्या:
SSC Exam : दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
MPSC News : दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर, आता निकालाची प्रतीक्षा
Maharashtra Public Service Commission, group b combined pre exam now, MPSC, MPSC exam