राज्य सेवा पूर्व परीक्षेचं शुल्क भरण्यासाठी शेवटची संधी, MPSC चा मोठा निर्णय
काही उमेदवारांनी ऑनलाईन पेमेंट जमा करुन देखील त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवर शुल्क जमा नसल्याचं दाखवलं जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. आयोगानं उमेदवारांच्या तक्रारीची दखल घेत आयोगानं 18 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं शुल्क जमा करण्याची संधी दिली आहे.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एमपीएससीनं उमदेवारांचा प्रतिसाद पाहता अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. ऑनलाईन अर्ज सादर करणे आणि ऑनलाईन पद्धतीनं शुल्क जमा करण्यास 2 नोव्हेंबर तर बँकेत शुल्क जमा करण्यासाठी 3 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. काही उमेदवारांनी ऑनलाईन पेमेंट जमा करुन देखील त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवर शुल्क जमा नसल्याचं दाखवलं जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. आयोगानं उमेदवारांच्या तक्रारीची दखल घेत आयोगानं 18 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं शुल्क जमा करण्याची संधी दिली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या अथवा भरणा करूनही खात्यात ‘Fees Paid’ असा शेरा दिसत नसलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्काचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सुविधा दि. 18 नोव्हें. 2021,23:59 पर्यंत सुरू राहील. pic.twitter.com/UQehHiBPrz
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 16, 2021
18 नोव्हेंबरपर्यंत शुल्क जमा करण्याची संधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांच्या समस्येची दखल घेत परीक्षा शुल्क जमा करण्याची आणखी एक संधी दिली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या उमेदवारांचे अर्ज परीक्षा शुल्काअभावी अपूर्ण राहिले आहेत त्यांनी आनलाईन पद्धतीनं 18 नोव्हेंबर रात्री 23.59 पर्यंत शुल्क सादर करावं, असं आवाहन आयोगानं केलं आहे.
परीक्षा शुल्क जमा झाल्याची खात्री करण्याचं आवाहन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं उमदेवारांना ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी एसबीआय ई पे आणि क्विक वॉलेट अशा दोन पेमेंट गेटवेची सुविधा दिली आहे. परीक्षा शुल्काचा भरणा करताना संपूर्ण पक्रिया झाल्याशिवाय बाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे. परीक्षा शुल्क यशस्वीरित्या जमा झाल्याची खात्री झाल्याशिवाय बाहेर पोर्टलवरुन पडू नये, अशा सूचना आयोगानं केल्या आहेत.
जानेवारीमध्ये पूर्व परीक्षा
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
पदांचा तपशील
उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
इतर बातम्या:
MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर
Maharashtra Public Service Commission gave chance to pay exam fee of state service exam 2021