महावितरणमध्ये 69 जागांवर अप्रेटिंस करायचीय? दहावी बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी
अमरावती जिल्ह्यातील उमेदवार ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. अर्ज जमा केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट महावितरण कार्याल्याकडे पाठवायची आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज पोहोचेल, अशा पद्धतीनं अर्ज पाठवावा लागेल.

अमरावती: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण या कंपनीनं 69 जागांवर अप्रेंटिससाठी अर्ज मागवले आहेत. वयाची 18 वर्ष पूर्ण असणारे आणि दहावी बारावीसह आयटीआयमधील संबंधित ट्रेड उत्तीर्ण असणारे विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. इलेक्ट्रिशयन, वायरमन आणि कोपा या पदासाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना अमरावती जिल्ह्यात नोकरी करावी लागेल.
पदांचा तपशील
इलेक्ट्रिशयन (32) वायरमन (32) आणि कोपा (05) जागांवर अप्रेंटिससाठी अर्ज मागण्यात आले आहेत.
अर्ज कुठे पाठवायचा?
अप्रेंटिससाठी इच्छुक उमेदवारांनी अर्जातील तपशील भरुन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड,अमरावती इथं अर्ज पाठवणं आवश्यक आहे.
अर्जाचं शुल्क
महावितरणमध्ये अप्रेंटिससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.
अर्ज कुठे भरायचा?
अमरावती जिल्ह्यातील उमेदवार ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. अर्ज जमा केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट महावितरण कार्याल्याकडे पाठवायची आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज पोहोचेल, अशा पद्धतीनं अर्ज पाठवावा लागेल. जे उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज सादर करणार नाहीत त्यांच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
390 पदांसाठी राज्य सेवा परीक्षेची जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
इतर बातम्या:
इतर बातम्या:
MPSC कडून मोठी अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रणाली अपग्रेड होणार, आयोगाकडून ट्विटद्वारे माहिती
mahavitaran recruitment 2021 Mahadiscom invites application for apprenticeship check details here