अग्निवीर भरती प्रक्रियेत अत्यंत मोठा बदल, आता ‘या’ पदावर होणार थेट अशाप्रकारे निवड

अग्निवीर भरती प्रक्रियेत एक मोठा बदल करण्यात आलाय. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हणजे लवकरच बंपर भरतीला सुरूवात केली जाणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही मोठी संधी आहे.

अग्निवीर भरती प्रक्रियेत अत्यंत मोठा बदल, आता 'या' पदावर होणार थेट अशाप्रकारे निवड
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 1:03 PM

मुंबई : भारतीय लष्कराने एक अत्यंत मोठा निर्णय घेत थेट अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरूवात केली. सुरूवातीला या निर्णयाचा जोरदार विरोध देखील झाला. आता भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. हा बदल 2024 -25 च्या भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहे. नुकताच यासंदर्भातील अधिसूचनाही ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे हा नवा नियम लिपिक आणि स्टोअरकीपर पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलाय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे.

विशेष म्हणजे हा नियम इतर भरती प्रक्रियेसाठी लागू नसणार आहे. सेना लिपिक आणि स्टोअरकीपर पदांच्या भरती प्रक्रियेसाठी हा नियम असेल. यामध्ये या दोन्ही पदांसाठी उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागणार आहे. अगोदरच्या नियमानुसार टायपिंग चाचणी देण्याची गरज नव्हती. मात्र, आता त्या नियमामध्ये बदल करण्यात आलाय.

या टायपिंग चाचणीमध्ये उमेदवाराला हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिटप्रमाणे ही चाचणी पार पडू शकते. काही सेना अधिकाऱ्यांनी याबद्दलची पुष्टी देखील केली आहे. मात्र, अजून या टायपिंग चाचणीचे मानक हे ठरवण्यात नाही आले. याबद्दलचे अपडेट देखील लवकरच पुढे येण्याची दाट शक्यता आहे.

विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. सतत भरती प्रक्रियेबद्दल बदल हे केले जात आहेत. लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर भरती मेळावा आयोजित केला जाईल. आता हा टायपिंग चाचणीचा देखील यामध्ये समावेश होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारावी आणि दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी विविध भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. रेल्वे विभागात देखील मेगा भरती सुरू आहे. रेल्वे विभागात सुरू असलेली ही मेगा भरती शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. वायुसेनेत देखील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.