Job News: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 427 पदांवर अप्रेंटिस भरती, दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांवर अप्रेंटिस करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येते.

Job News: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 427 पदांवर अप्रेंटिस भरती, दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 12:33 PM

मुंबई: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांवर अप्रेंटिस करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येते. भारतीय नौदलासाठी जहाजबांधणीचं काम माझगाव डॉक शिपबिल्डर्सकडून केलं जातं. पात्र भारतीय नागरिकांकडून अप्रेंटिस करु इच्छिणार्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 13 प्रकारच्या पदासांठी अप्रेंटिस करता येणार आहे. अप्रेंटिस करु इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय विविध पदांसाठी 14 ते 21 दरम्यानं असणं आवश्यक आहे.

अर्ज दाखल कुठे करायचा?

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिससाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://mazagaondock.in या वेबसाईटला बेट द्यावी. तिथे करिअर या लिंकवर क्लिक करा, पुढे ऑनलाईन रिक्रुटमेंट त्यानंतर पुढे अप्रेंटिस पदांवर क्लिक करा. यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरुन नोंदणी करा. यांतर तुम्हाला ईमेल प्राप्त होईल. यानंतर युझरनेम आणि पासवर्डद्वारे लॉगीन करा तुम्ही ज्यापदासाठी अर्ज करणार आहात. त्या पदासाठी असणारी पात्रता पाहून अर्ज दाखल करा.

अर्ज कधी दाखल करायचा

माझगाव डॉक शिपबिल्डर्सनं दिलेल्या जाहिरातीनुसार अप्रेंटिससाठी अर्ज करण्यास सुरुवात 22 जुलै 2021 पासून सुरुवात होत आहे. तर, 10 ऑगस्ट 2021 हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.18 ते 38 वर्ष वय असणाऱ्या वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. खुल्या, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये फी आकारण्यात येईल.

पदाचे नाव आणि संख्या

ड्राफ्ट्समन 20 पदे, इलेक्ट्रिशियन 34, फिटर 64, पाईप फिटर 72, स्ट्रक्चर फिटरच्या 63 पदांवर अप्रेंटिस करता येणार आहे. दोन वर्ष हा कालावधी अप्रेंटिससाठी निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी 3 हजार रुपये नंतर पहिल्यावर्षापर्यंत 6 हजार आणि दुसऱ्या वर्षासाठी 6600 रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

फिटर स्ट्रक्चरल 20, इलेक्ट्रिशियन 15, पाईप फिटर 15, वेल्डर 15, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट 15, कारपेंटर 21 आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेटिस कालावधी एक वर्ष असेल. पदनिहाय 8050 रुपये आणि 7700 विद्यावेतन दिलं जाणार आहे. उमदेवार 16 ते 21 वयोगटातील असावा.

रिगर 47 पदे आणि वेल्डर 26 पदे असणाऱ्या उमदेवारांना पहिल्या तीन महिन्यासाठी 2500 आणि त्यानंतर एका वर्षापर्यंत 5000 रुपये आणि दुसऱ्या वर्षसाठी 5500 विद्यावेतन दिलं जाईल.

शैक्षणिक पात्रता:

माझगाव डॉक शिपब्लिल्डर्स लिमिटेड द्वारे देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये वरील पदासांठी पात्रता देण्यात आली आहे. या पदांसाठी विविध पदांनुसार आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या: 

Post Office मधील बर्‍याच रिक्त जागांवर भरती, 10 वी किंवा 12 वी पासना संधी, पटापट तपासा

Sarkari Naukri 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ, त्वरा करा

(Mazagon Dock Shipbuilders Limited Apprentice Recruitment of various trades )

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.