महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 पदांसाठी भरती, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी संधी
एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं उमेदवारांना नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सोलापूर आणि पुणे येथे नोकरी करावी लागेल.
पुणे: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे, नांदेड, सोलापूर आणि पुणे विभागात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं उमेदवारांना नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सोलापूर आणि पुणे येथे नोकरी करावी लागेल. प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 100 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.mced.co.in/ या लिंकला भेट देऊन अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलंय.अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज कधी आणि कुठे करावा?
एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं नांदेड, सोलापूर आणि पुणे विभागात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 100 जागांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.mced.co.in/ या लिंकला भेट द्यावी.
पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. उमदेवरांकडे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याचा अनुभव आवश्यक आहे. याशिवाय संगणीकय ज्ञान त्याच्याकडं असणं आवश्यक आहे. उद्योजकता विकास व उद्योजकतेशी निगडीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाची जबाबदारी प्रशिक्षण आयोजकाची असेल.
वयोमर्यादा आणि शुल्क
या पदांवर भरती होण्यासाठी वय 21 ते 45 वर्षे असले पाहिजे. निवड झालेल्या उमेदवारांना पाच दिवसांचं निवासी प्रशिक्षण दिलं जाईल. यासाठी त्यांना 3750 रुपये शुल्क जमा करावं लागेल. पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष निवड मुलाखतीद्वारे करुन करार पद्धतीवर नेमणूक केली जाणार आहे.
अर्ज कसा करायचा?
उद्योजकता विकास केंद्राच्या सोलापूर, पुणे, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 24 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे, नांदेड, हिंगोली आणि सोलापूर येथे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या:
स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती, 35 हजारापर्यंत पगाराची संधी
MCED Programme Coordinator recruitment for 100 post check details here