महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सातारा जिल्ह्यात भरती, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी संधी

एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं सातारा जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 20 जागांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सातारा जिल्ह्यात भरती, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी संधी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 1:12 PM

सातारा: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सातारा जिल्ह्यात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं सातारा जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 20 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://forms.gle/BQNNhNkxUUyetyBy7 या लिंकला भेट द्या.अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज कधी आणि कुठे करावा?

एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं सातारा जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 20 जागांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://forms.gle/BQNNhNkxUUyetyBy7 या लिंकला भेट द्यावी.

पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. उमदेवरांकडे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याचा अनुभव आवश्यक आहे. याशिवाय संगणीकय ज्ञान त्याच्याकडं असणं आवश्यक आहे. उद्योजकता विकास व उद्योजकतेशी निगडीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाची जबाबदारी प्रशिक्षण आयोजकाची असेल.

वयोमर्यादा आणि शुल्क

या पदांवर भरती होण्यासाठी वय 21 ते 45 वर्षे असले पाहिजे. निवड झालेल्या उमेदवारांना पाच दिवसांचं निवासी प्रशिक्षण दिलं जाईल. यासाठी त्यांना 3750 रुपये शुल्क जमा करावं लागेल. पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष निवड मुलाखतीद्वारे करुन करार पद्धतीवर नेमणूक केली जाणार आहे.

अर्ज कसा करायचा?

उद्योजकता विकास केंद्राच्या सातारा जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 24 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी सातारा येथे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

नॅशनल फर्टिलायजर्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यास मुदतवाढ, 183 जागांवर भरती

Teacher Recruitment 2021: मुंबई महापालिकेत डीनबी शिक्षक पदासाठी 25 जागांची भरती, अर्ज कुठं करायचा?

MCED Satara district appeal to fill application form for Programme organizer 20 post

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....