मुंबई महापालिकेत सहायक प्राध्यापक पदाच्या 113 जागांवर भरती, 80 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत पगाराची संधी

मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाशी सलंग्न असलेल्या टी. एन. मेडिकल कॉलेजमध्ये कंत्राटी तत्त्वावर 113 सहायक प्राध्यापक (Assitant Professor) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

मुंबई  महापालिकेत सहायक प्राध्यापक पदाच्या 113 जागांवर भरती, 80 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत पगाराची संधी
job
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 7:00 AM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाशी सलंग्न असलेल्या टी. एन. मेडिकल कॉलेजमध्ये कंत्राटी तत्त्वावर 113 सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करू शकतात. उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. निवड झालेल्या उमदेवारांना 80 हजार ते 1 लाख रुपये मानधन दिलं जाणार आहे.

ऑफलाईन अर्ज करावा लागणार

टी.एन. मेडिकल कॉलेजमीधल सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई येथे अर्ज उपलब्ध होतील. सहायक प्राध्यापक पदावर निवड झालेल्या उमदेवाराला 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मानधन दिलं जाणार आहे. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा असून संबंधित शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे.

मुलाखतीद्वारे निवड

मुंबई महापालिकेनं सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांना 10 डिसेंबरची मुदत दिली आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुंबई महापालिकेकडून मुलाखतींचं आयोजन करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख नंतर जाहीर केली जाणार असून उमेदवारांना ती कळवली जाईल.

कंत्राटी तत्त्वावर निवड

मुंबई महापालिकेच्या टी. एन. मेडिकल कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या 113 जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जाईल, असं मुंबई महापालिकेकडून कळवण्यात आलं आहे.

शैक्षणिक पात्रता

सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमडी. एमएस, डीएनबी, एम.सीच, एएससी पदवी असणं आवश्यक आहे. यशिवाय सरकारी आणि खासगी संस्थेतील अनुभव असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 093 बेरोजगारांना रोजगार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

MPSC Exam Schedule 2022 : एमपीएससीकडून पुढील वर्षातील परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, कोणती परीक्षा कधी? वाचा एका क्लिक वर

MCGM Recruitment 2021 BMC invites applications for Assitant Professor 113 Post

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.