Medical Officer : वैद्यकीय अधिकारी व्हा, अर्ज करा ! पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जाणार…
उमेदवार मात्र एमबीबीएस (MBBS) हवा आहे आणि तेही 3 ते 5 वर्षे अनुभव असणारा. इच्छुक असाल तर 27 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. पगार चांगला आहे तो ही खाली दिलेला आहे. अर्ज पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण ( Sports Authority Of India ) मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठीची अर्ज प्रक्रिया (Recruitment Process) संपत आलीये. 27 एप्रिल 2022 ही अर्जाची शेवटची मुदत आहे. संपूर्ण भारतात या नोकरीची संधी उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. रिक्त जागा 23 आहेत. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. उमेदवार मात्र एमबीबीएस हवा आहे आणि तेही 3 ते 5 वर्षे अनुभव (Experience)असणारा. इच्छुक असाल तर 27 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. पगार चांगला आहे तो ही खाली दिलेला आहे. अर्ज पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
पदाचे नाव
वैद्यकीय अधिकारी
या पदासाठी लागणारं शिक्षण
1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी
2) 03 ते 05 वर्षे अनुभव
वयाची अट
27 एप्रिल 2022 रोजी – 40 वर्षांपर्यंत [ SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचं ठिकाण
संपूर्ण भारत
महत्त्वाचे
एकूण जागा – 23
वेतन – 1,25,000/- रुपये
अर्ज शुल्क – शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.sportsauthorityofindia.nic.in
ऑनलाईन अर्ज – Click Here
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
टीप : अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
इतर बातम्या: