AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Preliminary Exam | मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. MPSC postpone State Service Preliminary examinations

MPSC Preliminary Exam |  मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 1:50 PM

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. (MPSC postpone State Service Preliminary examinations which held on 14 march)

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पत्रानंतर निर्णय

14 मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत.त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्यानं ती पुढे ढकलण्यात यावी, असं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना आणि मराठा आरक्षण स्थगितीमुळे परीक्षा पुढे ढकलेल्या

दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती.

संबंधित बातम्या:

खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर !… MPSC च्या परीक्षा जाहीर; आता तयारीला लागा

Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

(MPSC postpone State Service Preliminary examination which held on 14 march)

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.