MPSC Exam : भोंगळ कारभार आयोगाचा, आयुष्य बरबाद विद्यार्थ्यांचं ! विद्यार्थ्यांनी जायचं कुठं ?
आठ प्रश्न रद्द आणि तीन उत्तरच बदलल्यावर एकदम आठ ते दहा मार्कांचा फरक येतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.आयोगाच्या या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात यावा, यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी घेण्यात यावी अशी मागणी आता विद्यार्थी करतायत.
मुंबई : राज्यसेवा दुय्यम सेवा गट ब पूर्वपरीक्षेच्या एकाच पेपरमधील आठ प्रश्न रद्द करण्यात आले आणि तीन प्रश्नांची तर उत्तरच बदलली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराचा त्रास विद्यार्थ्यांना होतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यूपीएससी (UPSC) प्रमाणेच परीक्षा का घेत नाही असा आता या विद्यार्थ्यांचा सवाल आहे. ज्या विद्यार्थ्यांना 50, 58 मार्क मिळून विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेत (Mains Exam) प्रवेश केला अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु केली. यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी खास पैसे भरून क्लासेस लावले. आता या विद्यार्थ्यांची आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे पुरती वाट लागलेली आहे. आठ प्रश्न रद्द आणि तीन उत्तरच बदलल्यावर एकदम आठ ते दहा मार्कांचा फरक येतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.आयोगाच्या या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात यावा, यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी घेण्यात यावी अशी मागणी आता विद्यार्थी करतायत.
राज्यसेवा दुय्यम सेवा गट ‘ ब ‘ पूर्वपरीक्षेच्या एकाच पेपरमधील आठ प्रश्न रद्द, तर तीन प्रश्नांची उत्तरेच बदलली आहे . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या ढिसाळ नियोजनामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय. एमपीएससीच्या या सातत्याने होणाऱ्या चूकांना तज्ज्ञ समितीच जबाबदार असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळे यूपीएससी प्रमाणे ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी हे विद्यार्थी करतायेत.
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा फटका परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसतोय. कधी नियम बदलतात, तर कधी न्यायालयीन कचाट्यात परीक्षा सापडते या सगळ्या भोंगळ कारभारचा फटका मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बसतोय. आताही एमपीएससी आयोगाच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब (Group B) साठी 1 हजार पदांसाठी ही भरती काढली होती. त्या परीक्षेत आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
उत्तरतालिकामधील 8 प्रश्न रद्द
एमपीएससी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका काल प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र आयोगाची ही उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाकडून या उत्तरतालिकामधील 8 प्रश्न रद्द केले असून त्यातील 3 प्रश्न बदलून देण्यात आले असल्याचंही सांगण्यात आलंय.
गुण कमी होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून हा आठ प्रश्न रद्द केल्याचे सांगण्यात आले असले तरी त्याचा खरा फटका हा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार असून गुण कमी होणार असल्याने परीक्षार्थींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.