MPSC : तुमची मागणी मान्य, मात्र CSAT उत्तीर्ण होणं बंधनकारक ! MPSC चा महत्त्वपूर्ण निर्णय, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश
एमपीएससीचे विद्यार्थी गेल्या 8 वर्षांपासून यासंदर्भातली मागणी करत होते आता विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलंय. आज एमपीएससी आयोगानं यासंदर्भातलं परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय.
मुंबई : एमपीएससी (MPSC) आयोगाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. CSAT चा पेपर आयोगानं केला ग्राह्य धरलाय. पूर्व परीक्षा (Preliminary Exam) पास होण्यासाठी निर्णायक भूमिका CSAT ची आहे. आज या संदर्भातलं परिपत्रक आयोगानं काढलंय. विद्यार्थ्यांना यापुढे 33 टक्के गुण घेणं बंधनकारक असणारे. GS च्या पेपरवरच विद्यार्थ्यांचा (Students)निकाल लागणार आहे. मात्र आता CSAT उत्तीर्ण होणं विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणारे. एमपीएससीचे विद्यार्थी गेल्या 8 वर्षांपासून यासंदर्भातली मागणी करत होते आता विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलंय. आज एमपीएससी आयोगानं यासंदर्भातलं परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय.
दरम्यान आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक बातमी समोर आलीये चंद्रकांत दळवी समितीचा अहवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात आलाय. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे या समितीचा अहवाल सुपूर्द करण्यात आलेला आहे. गट अ आणि गट ब च्या पूर्व परीक्षा कशा असाव्यात, अभ्यासक्रम कसा असावा आणि मुख्य परीक्षेचं स्वरूप काय असावं, या शिफारशींचा या अहवालात समावेश आहे. या समितीमध्ये माजी अप्पर पोलीस महासंचालक आणि एस एफ पाटील माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचा समावेश होता. आज हा अहवाल सादर करण्यात आलाय.