Nalco Recruitment 2021: नाल्कोमध्ये अधिकारी पदावर नोकरीची सुवर्णसंधी, 60 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार
नाल्कोच्यावतीनं पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट nalcoindia.com वर 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली: नॅशनल अॅल्युमिनिअर कंपनी लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर, जनरल मॅनेजर, ग्रुप जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर पदांवर मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. नाल्कोच्यावतीनं पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट nalcoindia.com वर 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
7 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची संधी
नाल्कोमध्ये नॅशनल अॅल्युमिनिअर कंपनी लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर, जनरल मॅनेजर, ग्रुप जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजरच्या 86 पदांवर अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 डिसेंबर 2021 निश्चित करण्यात आलेली आहे. मुदतीनंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, असं नाल्कोकडून कळवण्यात आलं आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
अर्ज कुठं करायचा?
नाल्कोमध्ये अधिकारी स्तरावरील 86 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट- nalcoindia.com वर क्लिक करून देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील
नाल्कोमध्ये नॅशनल अॅल्युमिनिअर कंपनी लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर (51), जनरल मॅनेजर (12), ग्रुप जनरल मॅनेजर (03), असिस्टंट जनरल मॅनेजर (07), डेप्युटी जनरल मॅनेजर (01), मॅनेजर (05) तर सीनिअर मॅनेजरच्या (07) पदांवर भरती करण्यात येत आहे.
पात्रता
नाल्कोमधील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांकडे भारत सरकारनं मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांकडे अनुभव असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमदेवारांना 60 हजार रुपये ते 2 लाख 80 हजार रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे.
निवड प्रक्रिया
नाल्कोमधील विविध पदांसाठी करण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
इतर बातम्या
पेट्रोल-डिझेलचे दर अमेरिकेत ठरतात, रावसाहेब दानवे यांचा अजब शोध