Nandurbar ZP Recruitment 2023 : नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, अर्जाची शेवटची तारीख जवळ!

Nandurbar Zilha Parishad Recruitment 2023 : राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. 19,460 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदरबार 475 जिल्हा परिषदेची भरतीसाठी अर्ज भरणे सुरु झाले आहे.

Nandurbar ZP Recruitment 2023 : नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, अर्जाची शेवटची तारीख जवळ!
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 10:18 AM

नंदुरबार : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे. मेगा भरती असून 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये यातील 475 जागांची भरती होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते  1,12,400 इतका असणार आहे.

आरोग्य सेवक (पुरूष) ४०% – १९ आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – ५१ आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – २८४ औषध निर्माण अधिकारी – ११ कंत्राटी ग्रामसेवक – १ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) – १६ कनिष्ठ लेखा अधिकारी – २ कनिष्ठ सहाय्यक – २८ कनिष्ठ सहाय्यक लेखा – ७ मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – ८ पशुधन पर्यवेक्षक – ११ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १३ विस्तार अधिकारी (कृषि) – १ विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी२) – ४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) – १९

एकूण – ४७५

कोण राबवणार भरती प्रक्रिया

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

कसा करावा अर्ज

  • जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
  • ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
Non Stop LIVE Update
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.