मेगा भरतीला सुरूवात, केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी..

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात आहात आणि आयटीआय झालाय? तर मग आता अजिबात नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.

मेगा भरतीला सुरूवात, केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी..
Naval Dockyard Mumbai
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 1:47 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहिर करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आता अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आयटीआय पास उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया इंडियन नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्याकडून राबवली जातंय. थेट नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलमध्ये शिकाऊ प्रशिक्षण कायद्यांतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. ही भरती प्रक्रिया 301 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. registration.ind.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल.

इलेक्ट्रीशियन, वेल्डर, मशीनिस्ट, इंस्ट्रूमेंट मॅकेनिक, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रोप्लेटर, पाइप फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा आयटीआय पास असावा. फक्त हेच नाही तर दहावी पास देखील असावा. संबंधित ट्रेडमध्ये तो आयटीआय पास असावा.

या भरती प्रक्रियेसाठी पुरूषांसोबत महिला देखील अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. चला तर मग करा लगेचच अर्ज.

आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.