Recruitment 2021: नेव्हल शिप रिपेअरमध्ये 173 जागांवर अप्रेंटिसची संधी , दहावी- बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी
नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये 173 पदांसाठी अप्रेंटिस भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये नेव्हल शिप रिपेअर यार्ड कारवार आणि नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड गोवा येथे अप्रेंटिसची संधी आहे.
मुंबई: नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये 173 पदांसाठी अप्रेंटिस भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये नेव्हल शिप रिपेअर यार्ड कारवार आणि नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड गोवा येथे अप्रेंटिसची संधी आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.apprenticeshipindia.gov.in/ वेबसाईटला भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी 19 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अर्ज कधी आणि कुठे करावा?
नेव्हल शिप रिपेअर यार्डनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवर 19 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रिंट द ऑफिसर इंचार्ज डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नावल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस कारवार, कर्नाटक या पत्यावर अर्ज पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये 173 पदांसाठी अप्रेंटिस सुरु आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये नेव्हल शिप रिपेअर यार्ड कारवार इथं अप्रेंटिसच्या 150 तर नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड गोवा येथे 23 जागांवर अप्रेंटिसची संधी आहे.
पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी आणि आयटीआय 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि शुल्क
या पदांवरील अप्रेंटिस करण्यासाठी उमेदवारांचं वय 14 ते 21 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी अर्जाची फी भरावी लागणार नाही, मात्र, उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर पोस्टानं पाठवायला लागणार आहेत.
बँक ऑफ बडोदामध्ये 376 जागांसाठी भरती
बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या 376 जागांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात. बँक ऑफ बडोदा बँकेतील पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर आहे. तर, अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या:
Naval Ship Repair Yard Recruitment 2021 Invites Application for 173 Apprentice Posts