NCL Recruitment 2021 : 8 वी, 10 वी पासवाल्यांसाठी नोकरीची संधी, 1500 पदांसाठी भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येतेय!

NCl Recruitment 2021: आठवी आणि दहावीच्या नंतर सरकारी नोकरी मिळणं म्हणजे आजच्या काळातलं दिवा स्वप्नच. अशाच वेळेस नॉर्दर्न कोलफिल्डस लिमिटेड (NCL)ने अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं आहे. या अधिसुचनेनुसार 1500 पदांवर नियुक्ती केली जाईल.

NCL Recruitment 2021 : 8 वी, 10 वी पासवाल्यांसाठी नोकरीची संधी, 1500 पदांसाठी भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येतेय!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 12:54 PM

NCl Recruitment 2021: आठवी आणि दहावीच्या नंतर सरकारी नोकरी मिळणं म्हणजे आजच्या काळातलं दिवा स्वप्नच. अशाच वेळेस नॉर्दर्न कोलफिल्डस लिमिटेड (NCL)ने अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं आहे. या अधिसुचनेनुसार 1500 पदांवर नियुक्ती केली जाईल. या पदांना अर्ज करण्यासाठी तुम्हाला एनसीएलची ऑफिशियल वेबसाईट nclcil.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल (NCL Recruitment 2021 NCL release notification for job vacancies).

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (Northern Coalfields Limited)अधिसुचनेनुसार या पदांच्या भरतीची प्रक्रिया 10 जूनपासून सुरु झालीय. तर अर्ज भरण्याची, निवेदन करण्याची शेवटची तारीख ही 9 जुलै 2021 अशी आहे. यात निवड झालेल्यांना नॉर्दर्न कोलफिड्स लिमिटेडमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच ज्यांना कुणाला या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी तातडीनं nclcil.in या साईटवर जाऊन करावा.

कोणत्या पदांसाठी भरती?

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये एकूण 1500 जागांवर भरती आहे. त्यात वेल्डरचे 100 पदं, फिटरसाठी 800 पदं, इलेक्ट्रीशियनसाठी 500 पदं, मोटर मेकॅनिकसाठी 100 पदांसाठी भरती असेल. यात ओपनसाठी 762 जागा आहेत, तर ओबीसींसाठी 225, अनुसूचित जातीसाठी 213, अनुसूचित जनजातीसाठी 300 पदं आहेत. तसंच पीडब्ल्यूडीच्या श्रेणीत येणाऱ्यांसाठी 60 जागा आहेत.

पात्रता

वेल्डर पदासाठी तुम्ही अर्ज करणार असाल, तर आठवी पास तसंच आयटीआय केलेलं असणं अनिवार्य आहे. जर तुम्ही इलेक्ट्रेशियन पदासाठी अर्ज करणार असाल, तर तुम्ही 10 वी पास सोबत आयटीआय केलेला असणं अनिवार्य आहे. तसंच फिटर पदासाठी अर्ज करायचा असेल, तरी 10 वी पास आणि आयटीआय अनिवार्य आहे. मोटर मेकॅनिक पदासाठी 10 पास तसंच आयटीआय पासचं सर्टीफिकेट लागेल.

वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया

NCL मधल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय हे 16 वर्षापेक्षा जास्त असायला हवं, तसंच 24 वर्षापेक्षा कमी. आरक्षित जागांसाठी मात्र वयाची मर्यादा त्या त्या नियमानुसार आहे. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी होईल, कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच नियुक्ती होईल.

(NCL Recruitment 2021 NCL release notification for job vacancies)

हेही वाचा :

IBPS RRB Recruitment 2021 : बँकेतील नोकरी, तगडा पगार, अर्ज करण्यासाठी उरले काही तास!

Job News: भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.