Doctor: आता नुसतं ‘डॉक्टर’ म्हणायचं नाही…घोळ संपणार! ‘पीएचडी’चा डॉक्टर आणि ‘मेडिकल डॉक्टर’ यातला फरक कळणार
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा 2019 द्वारे नोंदणीकृत डॉक्टरांच्या व्यावसायिक आचारसंहितेच्या मसुद्याची तरतूदही राष्ट्रीय वैद्यकीय आयोगा (नॅशनल मेडिकल कमिशन) ने केली आहे. त्यामुळे आता ॲलोपॅथीच्या डॉक्टरांची ओळख सहज होऊ शकते.
नवी दिल्ली : एमबीबीएस पदवीधारक किंवा ॲलोपॅथीच्या नोंदणीकृत डॉक्टरांना येत्या काळात त्यांच्या नावाशेजारी डॉक्टरांऐवजी वैद्यकीय डॉक्टर (Medica Doctor) लिहून देता येणार असल्याचे नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) जाहीर केले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा 2019 द्वारे नोंदणीकृत डॉक्टरांच्या व्यावसायिक आचारसंहितेच्या मसुद्याची तरतूदही राष्ट्रीय वैद्यकीय आयोगा (National Medical Comission) ने केली आहे. त्यामुळे आता ॲलोपॅथीच्या डॉक्टरांची ओळख सहज होऊ शकते. आपल्या नावापुढे डॉक्टर लिहिणारे बरेच लोक आहेत, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, त्याचबरोबर पीएचडीधारकही आपल्या नावापुढे डॉक्टर लिहून घेतात. अनेक वेळा मानद डॉक्टरेट पदवी दिलेले लोकं त्यांच्या नावापुढेही डॉक्टर लिहितात. अशा परिस्थितीत वैद्यकीय डॉक्टर कोण आहे आणि कोण नाही हे ओळखणे कठीण होऊन बसते.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नव्या तरतुदी लागू केल्यानंतर ॲलोपथीच्या डॉक्टरांची स्वतंत्रपणे ओळख पटवता येणार आहे. त्यांना आता त्यांच्या नावापुढे वैद्यकीय डॉक्टर लिहिता येणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या मसुद्यानुसार परदेशातून एखादा डॉक्टर आला असेल तर त्याच पदवीच्या नावासह त्याचा उल्लेख केला जाणार आहे, ज्याला नॅशनल मेडिकल कमिशनने भारतीय पदवी किंवा पदविकेच्या समकक्ष मान्यता दिलेली आहे. विषयाचा स्वतंत्र कोर्स केला असेल तरच ॲलोपॅथिक डॉक्टर कोणत्याही क्षेत्रात पारंगत असल्याचा दावा करू शकतो. केवळ अनुभवाच्या आधारे डॉक्टर कौशल्याचा दावा करू शकत नाहीत.
आयएएफ (IAF) ग्रुप सी रिक्रुटमेंट 2022
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भारतीय हवाई दलाकडून (Indian Air Frorce) एक आनंदाची बातमी आहे. हवाई दलाने हवाई दलाच्या अभिलेख कार्यालयात ग्रुप सी नागरी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी बारावी पास उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आमची सविस्तर बातमी वाचा इथे क्लिक करा.