NTPC Recruitment 2021 : 1.2 लाखापर्यंत पगार, इंजिनिअर-केमिस्टसाठी 230 पदांवर भरती, ‘असा’ भरा अर्ज
या पदांवर नोकरीचा अर्ज करण्यासाठी आजपासूनच प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी अखेरची तारीख 10 मार्च देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NTPC) ने असिस्टंट इंजिनिअर आणि असिस्टंट केमिस्टच्या भरतीसाठी रिक्त पदं जारी केली आहेत. या रिक्त जागा (NTPC Recruitment 2021) अंतर्गत एकूण 230 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या रिक्त जागेत इलेक्ट्रिकल, मेकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन ट्रेड्स आणि केमिस्ट या पदावर नोकर्या देण्यात येतील. (NTPC Recruitment 2021 Recruitment for 230 posts for Assistant Engineer and Chemist Salary up to Rs 12 lakhs how to fill the application form)
या पदांवर नोकरीचा अर्ज करण्यासाठी आजपासूनच प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी अखेरची तारीख 10 मार्च देण्यात आली आहे. एनटीपीसीच्या या भर्तीसाठी (NTPC Recruitment 2021) अर्ज हा अधिकृत वेबसाईटवर ntpccareers.net उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं नोकरी लागणाऱ्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. यासाठी निवडलेल्या उमेदवारांना 30,000 ते 120,000 रुपयांचा पगार मिळेल.
किती जागांसाठी होणार भरती?
या भरतीमध्ये एकूण 230 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 200 इलेक्ट्रिकलइलेक्ट्रिकल, मेकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन ट्रेड्स साठी तर केमिस्ट पदासाठी 30 जागा घेतल्या जाणार आहेत. 23 फेब्रुवारीला या भरतीसंदर्भात अधिकृत वेबसाईटवरून माहिती देण्यात आली आहे.
कसा करा अर्ज
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आधी तुम्हाला नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी) ntpccareers.net अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. यामध्ये तुम्हाला नोकरीचा अर्ज भरण्यासाठी पर्याय दिसतील. इथं Latest Notification फोल्डरमध्ये Recruitment of Experienced Assistant Engineers आणि Experienced Assistant Chemist पर्यायावर क्लिक करा आणि नोंदणी फॉर्म भरा. नोंदणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. यानंतर तुमच्या नंबरवर मेसेज येईल. त्यात नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहिलेला असेल. या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने अर्ज भरा.
आवश्यक पात्रता
असिस्टेंट इंजिनिअर पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार जवळच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचा पदवीधर असायला हवा. तर असिस्टेट केमिस्टकडे 60% गुणांसह एमएससी पदवी असावी. यासाठी निवडलेल्या उमेदवारांना 30,000 ते 120,000 रुपयांचा पगार मिळेल. (NTPC Recruitment 2021 Recruitment for 230 posts for Assistant Engineer and Chemist Salary up to Rs 12 lakhs how to fill the application form)
संबंधित बातम्या –
सीडॅक नोएडामध्ये बर्याच पदांसाठी नोकरीची संधी; आजच अर्ज करा
IDBI Recruitment 2021: वैद्यकीय अधिकारी पदांवर तात्पुरती नियुक्ती; दर तासाला मिळणार 1000 रुपये
UCIL Recruitment 2021: 47 जागांवर बंपर भरती, शासकीय नोकरीसाठी करा अर्ज
(NTPC Recruitment 2021 Recruitment for 230 posts for Assistant Engineer and Chemist Salary up to Rs 12 lakhs how to fill the application form)