NTPC Recruitment 2021: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसीने कार्यकारी व वरिष्ठ कार्यकारी या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

NTPC Recruitment 2021: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
NTPC
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 8:52 PM

नवी दिल्ली: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसीने कार्यकारी व वरिष्ठ कार्यकारी या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार एनटीपीसीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात.

पात्र उमेदवार एनटीपीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात. एनटीपीसीच्या ntpc.co.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करता येईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे. पात्र, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एनटीपीसीनं जारी केलेली अधिकृत नोटिफिकेशन वाचणं आवश्यक आहे. 6 ऑगस्टपूर्वी ऑनलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दाखल करता येईल.

शैक्षणिक पात्रता:

कार्यकारी (बिझनेस अनॅलिस्ट) – किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून बिझनेस अनॅलिस्ट / व्यवसाय प्रशासन मधील पदव्युत्तर पदवी.

वरिष्ठ कार्यकारी (सोलर) – मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही विषयात अभियांत्रिकीची पदवी किमान 60% गुणांसह.

वरिष्ठ कार्यकारी (कंपनी सचिव) – आयसीएसआयचा सदस्य.

वरिष्ठ कार्यकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) – मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कम्युनिकेशन अ‌ॅडव्हटायझिंग/ जनसंपर्क, मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारितेतील पदव्युत्तर पदविका आवश्यक आहे.

एक्झिक्युटिव्ह (क्लीन टेक्नॉलॉजीज) – ऊर्जा क्षेत्रातील एम.टेक / पीएच.डी. सह किमान 60०% गुण असणार्‍या कोणत्याही विषयात अभियांत्रिकी / तंत्रज्ञान या पदवीला प्राधान्य दिले जाईल.

पदसंख्या

कार्यकारी – 19 पदे

वरिष्ठ कार्यकारी – 3 पदे

वयोमर्यादा

कार्यकारी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच, वरिष्ठ कार्यकारी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येणार आहे.

निवड कशी होईल

या पदांवरील उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. या रिक्त जागांसाठी कोणत्याही पदासाठी परीक्षा होणार नाही. उमेदवारांना गुणवत्ता यादीच्या आधारे शॉर्टलिस्ट करुन मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

इतर बातम्या:

रेंजच्या बाबतीत या इलेक्ट्रिक सायकलसमोर स्कूटरही ठरतात अपयशी, सिंगल चार्जमध्ये 72 किमीपर्यंत धावते

Maharashtra Flood : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

Ntpc recruitment 2021 vacancy for executive officer and various post and details

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.