Oil India Recruitment 2021: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ज्युनिअर असिस्टंट पदावर भरती

ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये 120 पदांसाठी ज्युनिअर असिस्टंट या पदावर भरती प्रक्रिया सुरु असून 15 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

Oil India Recruitment 2021:  ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ज्युनिअर असिस्टंट पदावर भरती
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 6:49 PM

Oil India Limited Recruitment 2021 नवी दिल्ली: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार एकूण 120 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑईल इंडिया लिमिटेडनं त्यांच्या अधिकृत वेबसाईट oil-india.com वर याबाबत सविस्तर माहिती देणारे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑइल इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन वाचून घेणे आवश्यक आहे. ( Oil India Recruitment 2021 for Junior Assistant Post Click here to apply and all details )

अर्ज प्रक्रिया

ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2021 असा आहे. वेबसाईटवर अर्ज दाखल करताना उमेदवारांनी काळजीपुर्वक अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज बाद होऊ शकतो.

अर्ज दाखल कसा करायचा

स्टेप 1 ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम ऑईल इंडियाच्या ऑफिशिअल वेबसाईट oil-india.com ला भेट द्यावी. स्टेप 2 ज्युनिअर असिस्टंट पदासाठी भरती या लिंक वर क्लिक करा. स्टेप 3 यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल आवश्यक ती माहिती भरुन वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा स्टेप 4 यानंतर तुम्ही ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून ओटीपी मिळवा. स्टेप 5 यानंतर ओटीपी मिळवल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल. स्टेप 6 संपूर्ण अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. स्टेप 7 शेवटी परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि भविष्यातील माहितीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रिंट आउट काढून सोबत ठेवा.

शैक्षणिक पात्रता

ऑईल इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशन मध्ये ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज केलेला उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विद्या शाखेतून पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी त्यांना पदवीला आणि दहावी, बारावीला 40 टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असावेत. याशिवाय उमेदवाराचा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये डिप्लोमा झालेला आवश्यक आहे. उमेदवारांना एम एस वर्ड एक्सेल पॉवरपॉइंट ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

18 ते 30 वयोगटातील पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात तर आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 35 असेल तर ओबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 33 असेल.

अर्जाचे शुल्क

खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचं शुल्क 200 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ईडब्ल्यूएस, दिव्यांग, माजी सैनिक उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.

संबंधित बातम्या

सरकारी वकील vs पालांडेंचे वकील, दोघांचा परस्पर विरोधात्मक युक्तीवाद, अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?

Breaking : गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

Oil India Recruitment 2021 for Junior Assistant Post Click here to apply and all details

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.