SCI Jobs : भारतीय सर्वोच्च न्यायालय ! अर्ज निवांत करा पण अटी नियम आजच वाचा…
कनिष्ठ अनुवादक पदाच्या एकूण 25 रिक्त जागांची भरती प्रक्रिया भारतीय सर्वोच्च न्यायालयात सुरु करण्यात आलीये. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज करायची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे.
नवी दिल्ली : कनिष्ठ अनुवादक ( Court Assistant) पदाच्या एकूण 25 रिक्त जागांची भरती प्रक्रिया भारतीय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court Of India) सुरु करण्यात आलीये. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन (Online) भरायचे आहेत. अर्ज करायची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे. या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे असावं. वयाच्या अटीत SC,ST आणि OBC प्रवर्गाला सूट देण्यात आलीये. नोकरीचं ठिकाण दिल्ली असेल. अधिक माहितीसाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याकरता खाली लिंक दिलेली आहे. अर्ज फक्त पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता बघून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
पदाचे नाव
कनिष्ठ अनुवादक (कोर्ट असिस्टंट )
शैक्षणिक पात्रता
1) इंग्रजी विषयासह त्या त्या पदानुसार संबंधित विषयात पदवी असावी 2) ०2 वर्षाचा ट्रान्स्लेशनचा अनुभव असावा ( सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघा )
महत्त्वाचे
एकूण जागा – 25
वयाची अट – 1 जानेवारी 2021 रोजी – 18 ते 32 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट ]
अर्ज शुल्क – 500/- रुपये [ SC/ST/ PWD/ ExSM – शुल्क नाही ]
नोकरीचं ठिकाण – दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
वेतन – नियमानुसार
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2022
अर्ज – https://jobapply.in/SC2022Translator/
अधिकृत वेबसाईट – www.sci.gov.in
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
इतर बातम्या :