Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पात्रता आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या

चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आजच अर्ज भरा आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नोकरी मिळवा, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पात्रता आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 14, 2025 | 1:06 PM

Railway ALP Vacancy 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्याकडे एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेने हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. विभागाने असिस्टेंट लोको पायलट (ALP) साठी 9 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी 10 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील येथे पहा…

ऑनलाईन सुरु आहे प्रक्रिया…

रेल्वेने 9,900 पदांसाठी पात्र तरुणांकडून अर्ज मागवले आहेत. रेल्वे भरती मंडळाने (RRB) स्पष्ट केले आहे की अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेले फॉर्म नाकारले जातील. अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत सूचना नक्कीच वाचा जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही.

शैक्षणिक योग्यता आणि वयाची अट

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल सांगायंच झालं तर, 10 ते 30 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. एससी/एसटी/ओबीसी सारख्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. वयाची गणना 1 जुलै 2025 आधारावर केली जाईल.

हे सुद्धा वाचा

अर्ज शुल्क

जनरल / OBC/ EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क आहे. तर एसटी, PwBD/Ex-Servicemen उमेदवारांसाठी फक्त 250 रुपये शल्क आहे. शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.

निवड प्रक्रिया

निवडीसाठी उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागेल. त्यात CBT-1 (प्रिलिम्स), CBT-2 (मेन्स) आणि CBAT (अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) यांचा समावेश आहे. यामध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर नोकरी दिली जाईल.

कसा दाखल कराल अर्ज?

अर्ज दाखल करण्याआधी RRB या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर ALP भरती 2025 लिंकवर क्लिक करा. सर्वात आधी रजिस्ट्रेशन करा त्यानंतर लॉगिन फॉर्म भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करा. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा. सबमिट झालेल्या फॉर्मची प्रिंट आऊट स्वतःकडे सुरक्षित ठेवा.

राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत.
पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट
पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट.
'..असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात'; बावनकुळेंनी ओढले ताशेरे
'..असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात'; बावनकुळेंनी ओढले ताशेरे.
मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?
मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?.
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस.
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.