बारामती: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC Bank) सध्या 800 जागा रिक्त आहेत. बँकेची आर्थिक क्षमता उत्तम असून, लवकरच गुणवत्तेनुसार या जागांची भरती (Recruitment) केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात 200 जागांची भरती केली होती. त्यातील 61 जणांनी नोकरी सोडली. परराज्यातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर नोकरी मिळाल्यावर ते नोकरी सोडतात. त्यामुळे यापुढील भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी कायद्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न सहकारमंत्र्यांशी बोलून केला जाईल असेही ते म्हणाले. कोर्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील बँकेच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्हा बँकेने पाच लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, जिल्ह्यात अवघ्या 1200 शेतकर्यांना त्याचा फायदा होत असल्याने या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, ‘छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव उपस्थित होते.
कांद्याचे दर घसरले आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी नाफेडला पत्र देत खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. परंतु, नाफेडला यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. ती मिळाल्यानंतर चांगल्या दराने कांदा खरेदी करता येईल. वेळ पडल्यास यासंबंधी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचाही सल्ला घेऊ, असे पवार म्हणाले. साखर कारखान्यांनी वीजविक्रीसंबंधी महावितरणशी केलेल्या करारात तो दंड लागला होता. तो आता काढला असून, कारखान्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करीत मंजुरी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलली आहे. यूजीसीच्या राष्टीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आता अर्ज प्रक्रिया 30 मे 2022 पर्यंत सुरु राहील. याआधी अर्ज करायची शेवटची तारीख 20 मे 2022 होती जी आता 30 मे करण्यात आलीये. दरम्यान NTA कडून उमेदवारांसाठी करेक्शन विंडो सुरु करण्यात आलीये. या विंडोवर जाऊन उमेदवार आपल्या फॉर्म भरताना झालेल्या चुका सुधारू शकतो. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.