PM Modi LIVE on Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे विद्यार्थ्यांना 10 मंत्र
परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमात मोदींनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांना समजतील अशी उदाहरण देऊन मनातील भीती दूर केली. कार्यक्रमात देशातील विद्यार्थ्यांशी (Student)नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. संवाद साधत असताना मोदींनी विद्यार्थ्यांना दिलेले 10 मंत्र दिले.
नवी दिल्ली – परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमात मोदींनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांना समजतील अशी उदाहरण देऊन मनातील भीती दूर केली. कार्यक्रमात देशातील विद्यार्थ्यांशी (Student)नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. संवाद साधत असताना मोदींनी विद्यार्थ्यांना दिलेले 10 मंत्र दिले.
- विद्यार्थ्यांशी प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, एप्रिल हा सणांचा, परीक्षांचा महिना आहे. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सणांचा आनंद नीट घेता येत नाही. परीक्षेला तुम्ही तुमचा सण बनवा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
- परीक्षेतील गुण, कामगिरी याविषयी चिंतेच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, परीक्षा हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा एक भाग आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कोणत्या ना कोणत्या परीक्षेतून आपण जात असतो. परीक्षेची वेळ ही तुमची दैनंदिन दिनचर्या म्हणून हाताळायला हवी. तुम्ही जे करत आहात ते करा आणि त्यावर विश्वास ठेवा. उत्सवाच्या मूडमध्ये परीक्षा द्या, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
- मनाशी ठरवा की परीक्षा हा जीवनाचा एक सोपा भाग आहे. आपल्या विकासाच्या प्रवासातील हे छोटे टप्पे आहेत. हा टप्पाही आपण पार केला आहे. यापूर्वीही आम्ही अनेकवेळा परीक्षा दिली आहे. हा विश्वास निर्माण झाला की हाच अनुभव येणाऱ्या परीक्षेसाठी तुमची ताकद बनतो.
- माध्यम ही समस्या नाही, मनाची समस्या आहे. मनावर नियंत्रण असेल, तर ऑनलाइन अभ्यासही लक्ष केंद्रित करून करता येतो. ऑनलाइन हे शिकण्यासाठी आहे, ऑफलाइन म्हणजे काय शिकले आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आहे.
- जेव्हा तुम्ही ऑनलाइन अभ्यास करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात अभ्यास करता की रील्स पाहता ? दोष ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा नाही. वर्गातही कितीतरी वेळा तुमचं शरीर वर्गात असतं, तुमची नजर देखील शिक्षकाकडे असते, परंतु एकही शब्द कानावर जाणार नाही, कारण तुमचं मन दुसरीकडे कुठेतरी असतं.
- तुम्ही ऑनलाइन खूप चांगला डोसा बनवायला शिकू शकता, पण खाऊ शकत नाही. डोसा खायचा तर खऱ्या आयुष्यात बनवावा लागतो. मग त्यांनी समजावून सांगितले की तुम्ही कोणत्याही विषयावर ऑनलाइन ज्ञान मिळवू शकता आणि ऑफलाइन तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी तयार करू शकता.
- जितके तुम्ही अंतरमनात गुंताल तितकी तुम्हाला तुमची ऊर्जा जाणवेल. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर मला वाटत नाही की या सर्व त्रासांमुळे तुमच्यासाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण डिजीटल गॅजेट्सच्या माध्यमातून खूप सहज आणि मोठ्या प्रमाणावर गोष्टी साध्य करू शकतो. आपण याला संधी मानली पाहिजे, समस्या नाही.
- आम्ही 2014 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कामात गुंतलो होतो. या कामासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात विचारमंथन झाले. देशातील चांगले अभ्यासक, विज्ञान-तंत्रज्ञानाशी निगडित लोकांच्या नेतृत्वाखाली त्यावर चर्चा झाली. त्यावरून तयार केलेला मसुदा नंतर लोकांपर्यंत पोहोचवला, त्यावर 15-20 लाख प्रतिक्रिया आल्या. एवढ्या मोठ्या प्रयत्नानंतर नवे शैक्षणिक धोरण आले आहे. सरकारच्या प्रत्येक कामाला राजकीय पक्ष विरोध करतात, पण नव्या शिक्षण धोरणाला कोणीही विरोध केला नाही. सर्वांनी त्याचा स्वीकार केला.
- 21 व्या शतकाच्या अनुषंगाने आपण सर्व यंत्रणा आणि धोरणे तयार केली पाहिजेत, असे पंतप्रधान म्हणाले. जर आपण स्वतःला गुंतवले नाही तर आपण स्तब्ध होऊन मागे पडू. पूर्वी आपल्या देशात खेळ हा अतिरिक्त कार्यक्रम मानला जात असे. मात्र या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्याला शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहे.
- हे ओझं घेऊन जायचं आहे. जे केलं आहे त्याला विश्वासाने पुढे न्यायचं आहे. एखाद्या गोष्टीत मेहनत कमी पडली असेल तर त्यात एवढं काय घाबरून जायचं? इतर गोष्टीत माझा आत्मविश्वास असेल तर बाकीच्या गोष्टी पूर्ण होतात. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पॅनिक क्रिएट होईल असं वातावरण करू नका.
Non Stop LIVE Update