पुण्यात शेकडो जागांची भरती, अर्ज लगेच करा, कारण मुदत आहे…
Pune Job : पुणे मनपातील या जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत करता येणार आहे. उमेदवारांना अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
राज्यातील युवकांना पुणेकर होण्याची संधी मिळाली आहे. पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. शेकडो जागांची भरती पुणे महानगरपालिकेने काढली आहे. या भरतीसाठी लगेच अर्ज करावा लागणार आहे. कारण १९ ऑगस्टपर्यंतच मुदत दिली गेली आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पुणे महापालिकेतील विविध विभागांत ६८२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुणे मनपाने यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तसेच पुणे मनपाच्या वेबसाईटवर त्याची माहिती दिली आहे. या जागा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या आहेत.
कोणत्या पदांसाठी भरती ?
पुणे महानगरपालिकेतील विविध विभागासाठी ही भरती प्रक्रिया आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन,वेल्डिंग, पेटिंग ही पदे आहेत. दहावी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात आय.टी.आय, अभियांत्रिकीची पदवी, अभियांत्रिकी पदविका या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
पुणे मनपातील या जागा शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत आहेत. पुणे मनपात सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच मानधनही मिळणार आहे. उमेदवारांना मिळणारे मानधन हे पदांनुसार असणार आहे. उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान हवे.
अर्ज कसा करावा
पुणे मनपातील या जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत करता येणार आहे. उमेदवारांना अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ही लाडका भाऊ योजना
पुणे मनपातील भरती माझा लाडका भाऊ योजनाची आहे. शासनाच्या युवा कार्य प्रशिक्षण विभागाची ही योजना आहे. या योजनेनुसार राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. यात उद्योग, खासगी क्षेत्र, आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहे. त्यासाठी वेतन शासन देणार आहे. योजनेसाठी ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.