नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं विद्यार्थ्यांना रेल्वेचं काम आणि रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये चालणाऱ्या कामाची माहिती व्हावी म्हणून चांगल पाऊल उचललं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी युवकांना सशक्त बनवण्यासाठी रेल्वे कौशल्य विकास योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या तीन वर्षात 50 हजार युवकांना प्रशिक्षित करणार आहे. या योजनेचं उद्घाटनं केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्र्यांनी यावेळी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
रेल्वे कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 1 हजार युवकांना प्रशिक्षण देणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, फिटर अशा ट्रेडचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यानंतर प्रादेशिक विभागांच्या मागणीनुसार आणि रेल्वेच्या विभागीय विभागांच्या उत्पादन करणाऱ्या विभागांच्या मागणीनुसार प्रशिक्षण कार्यक्रमांची संख्या वाढवली जाणार आहे. हे प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची निवड त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील.
रेल्वे कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण मिळवण्यासाठी उमदेवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ज्यांचं वय 18-35 च्या दरम्यान आहे ते विद्यार्थी या साठी अर्ज सादर करु शकतात. प्रशिक्षण मिळणारे उमदेवार रेल्वेतील नोकरीवर दावा करु शकत नाहीत.
रेल्वे कौशल्य विकास योजनेचा अभ्यासक्रम वाराणसी लोकोमोटिव्ह वर्क्स यांनी तयार केला आहे. प्रशिक्षणार्थींना एका मूल्यांकन प्रक्रियेतून पुढं जावं लागेल. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्थेद्वारे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान टुलकिट देखील दिलं जाणार आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थी त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग स्वंयरोजगार मिळवण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील उद्योग रोजगार क्षमता वाढवली जाऊ शकते.
रेल्वे कौशल्य विकास योजनेच्या अतंर्गत प्रशिक्षण देण्यासाठी इंडियन रेल्वेनं 17 विभागातील 7 प्रोडक्शन यूनिटमधील 75 प्रशिक्षण केंद्रांची निवड करण्यात आली आहे. ही योजना अत्मनिर्भर भारत योजनेचा भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतीय रेल्वेच्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये विविध पदांसाठी अप्रेंटिसची संधी निर्माण झाली आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये एकूण 492 पदांवर अप्रेंटिससाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. तर, पात्र उमेदवार 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. फिटर ,वेल्डर, वाईंडर, मशिनिस्ट, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमन या पदांसाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे.
जे उमेदवार आयरआसीटीसीमध्ये अप्रेटिंस करु इच्छितात ते सविस्तर नोटिफिकेशन वाचल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकतात. apprenticeshipindia.org या वेबसाईटवर पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.
इतर बातम्या:
Health Tips : पावसाळ्यात या पाच गोष्टी चुकूनही खाऊ, अन्यथा आरोग्यवरील संकट ठरलेलं
Karnataka Tourist Places : कर्नाटकमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? या ठिकाणांना नक्की भेट द्या
Rail kaushal vikas yojana started for training of 50000 youth in 3 years by ministry of railway