न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 प्रशासकीय अधिकारीपदांसाठी भरती, 21 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
NIACL ने 21 सप्टेंबर 2021 ला सर्व टप्पे अर्थात नोंदणी, अर्ज शुल्क सबमिशन आणि संपूर्ण अर्ज प्रक्रियेअंतर्गत अर्ज संपादनासाठी शेवटची तारीख ठरवलीय. त्यानंतर उमेदवार 6 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्यांच्या ऑनलाईन सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट-आउट घेऊ शकतील.
नवी दिल्ली : NIACL AO Recruitment 2021: सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने 300 प्रशासकीय अधिकारी किंवा एओ जर्नालिस्ट या पदांवर भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज आज 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू झालाय. एनआयएसीएलने अधिकृत वेबसाईट newindia.co.in वर AO पदांसाठी अर्ज उपलब्ध करून दिलाय, ज्याद्वारे उमेदवार अर्ज करू शकतात. NIACL ने 21 सप्टेंबर 2021 ला सर्व टप्पे अर्थात नोंदणी, अर्ज शुल्क सबमिशन आणि संपूर्ण अर्ज प्रक्रियेअंतर्गत अर्ज संपादनासाठी शेवटची तारीख ठरवलीय. त्यानंतर उमेदवार 6 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्यांच्या ऑनलाईन सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट-आउट घेऊ शकतील.
कोण अर्ज करू शकतो?
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी पदांसाठी, फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलीय. एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी किमान कट ऑफ 55 टक्के आहे. याव्यतिरिक्त 1 एप्रिल 2021 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. विविध आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वरच्या वयोमर्यादेत शिथिलता आहे, अधिक तपशीलांसाठी भरती अधिसूचना पाहा.
निवड अशी असेल?
प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये यशस्वी घोषित उमेदवारांना नोव्हेंबर 2021 मध्ये प्रस्तावित मुख्य परीक्षेला उपस्थित राहावे लागेल. मुख्य परीक्षा गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
संबंधित बातम्या
6 लाख कोटींच्या विक्रीसाठी मोदी सरकारची यादी तयार, जाणून घ्या काय काय विकणार?
भारताच्या नवरत्न कंपन्या विकण्याची कोणतीही योजना नाही, सरकारचं विरोधकांना प्रत्युत्तर
Recruitment for 300 Administrative Posts in New India Assurance Company, Apply by 21st September