MNLU Nagpur : नोकरी आहे त काहून जाऊन नाई राहिले ? महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये जागाय ना…

| Updated on: May 12, 2022 | 3:16 PM

31 मे 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. एकूण 16 पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. 8वी उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण, पदवीधर, मास्टर्स अशी शैक्षणिक पात्रतेची पदांनुसार अट आहे. नोकरीचं ठिकाण अर्थातच नागपूर आहे.

MNLU Nagpur : नोकरी आहे त काहून जाऊन नाई राहिले ? महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये जागाय ना...
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये जागाय ना भाऊ
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

नागपूर : नागपुरात महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये (Maharashtra National Law University) भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करताना उमेदवार ऑफलाइन (Offline) पद्धतीनं अर्ज करू शकतो. कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO : डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108 (महाराष्ट्र ) या पत्त्यावर हा अर्ज करायचा आहे. 31 मे 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. एकूण 16 पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) दिलेली आहे. 8वी उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण, पदवीधर, मास्टर्स अशी शैक्षणिक पात्रतेची पदांनुसार अट आहे. नोकरीचं ठिकाण अर्थातच नागपूर आहे.

पदाचे नाव

वित्त आणि लेखाधिकारी (Finance and Accounts Officer), प्रणाली प्रशासक (System Administrator), वसतिगृह वॉर्डन (पुरुष) (Hostel Warden Male), वसतिगृह वॉर्डन (महिला) (Hostel Warden Female), सिस्टम ऑपरेटर (System Operator), कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant), चालक (एलएमव्ही) ( Drvier LMV), चालक (एचएमव्ही) (Driver HMV), परिचारिका (Nurse), सुतार (Carpenter), कनिष्ठ प्लम्बर (Junior Plumber),कुक (Cook)

शैक्षणिक पात्रता

8th/10th/12th/Bachelor Degree/ Masters Degree

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO:डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108 (महाराष्ट्र )

पदांनुसार उपलब्ध जागा

रिक्त पदे – 16 पदे

  1. वित्त आणि लेखाधिकारी (Finance and Accounts Officer) – 01
  2. प्रणाली प्रशासक (System Administrator) – 01
  3. वसतिगृह वॉर्डन (पुरुष) (Hostel Warden Male) – 03
  4. वसतिगृह वॉर्डन (महिला) (Hostel Warden Female) – 03
  5. सिस्टम ऑपरेटर (System Operator) – 01
  6. कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) – 01
  7. चालक (एलएमव्ही) ( Drvier LMV) – 01
  8. चालक (एचएमव्ही) (Driver HMV)- 01
  9. परिचारिका (Nurse)- 01
  10. सुतार (Carpenter)- 01
  11. कनिष्ठ प्लम्बर (Junior Plumber) – 01
  12. कुक (Cook) – 01

इतर माहिती

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज करायची पद्धत – ऑफलाइन

अर्जाची शेवटची मुदत – 31 मे 2022

महत्त्वाचे

Official Website – https://www.nlunagpur.ac.in/

Notification – Click Here

अर्जाचा नमुना – Click Here 

टीप : कृपया अधिकृत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.