ना परीक्षा ना मुलाखत, थेट करा रेल्वे विभागात नोकरी, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी
रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट बंपर भरती सुरू आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावेत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 3015 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. आजपासून इच्छुक उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया पश्चिम मध्य रेल्वेकडून राबवली जात आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला wcr.indianrailways.gov.in. या साईटवर आरामात मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवार हा बारावी पास असावा. तसेच बारावीमध्ये उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असावेत. फक्त हेच नाही तर उमेदवाराचा संबंधित आयटीआय ट्रेड झालेला असणे आवश्यक आहे. आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 24 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 136 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना 36 रूपये फिस ही भरावी लागणार. उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी अर्ज करावीत.