बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

| Updated on: Dec 02, 2023 | 4:24 PM

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. थेट अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी. बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. अजिबातच उशीर न करता आजच अर्ज करा. विशेष म्हणजे पदवीधर असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज
Follow us on

मुंबई : जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. थेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी मिळेल. बँक ऑफ इंडियाच्या वतीने ही भरती प्रक्रिया सुरू आहे. बँक ऑफ इंडियाच्या आरएसईटीआय विभागाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट झोनल शाखेसाठीच ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग उशीर कशाला करता लगेचच अर्ज करा आणि मिळवा नोकरी. मात्र, या भरती प्रक्रियाचा अर्ज आॅनलाईन पद्धतीने करता नाही येणार.

तुम्हाला पोस्ट विभागाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात जाणून अर्ज दाखल करावा लागणार आहे. हा अर्ज जमा करण्याची शेवटीची तारीख ही 20 डिसेंबर 2023 आहे. बँक ऑफ इंडिया, झोनल मॅनेजर, रायगड झोनल ऑफिस, एसटी स्टँड समोर, अलिबाग जिल्हा रायगड 402201 हा पत्ता अर्ज करण्यासाठी आहे. आता अगदी कमी दिवस राहिले असल्याने लगेचच अर्ज करा.

ही भरती प्रक्रिया फॅकल्टी या पदासाठी होत आहे. तुम्ही पदवीधर असाल तरीही अर्ज करू शकता. उमेदवाराच्या नोकरीची ठिकाण हे रायगड असणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट आहे. 25 ते 65 ही उमेदवारांसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अगोदर लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे.

जे उमेदवार लेखी परीक्षेत पास होतील, त्यांची निवड मुलाखतीसाठी केली जाईल. मात्र, मुलाखतीच्या अगोदर तुम्हाला लेखी परीक्षा पास होणे अत्यंत महत्वाचे आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची शेवटीची तारीख ही 20 डिसेंबर आहे. उमेदवाराची कौशल्य चाचणी देखील घेतली जाणार आहे. 20 डिसेंबरला उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याचे देखील सांगितले जातंय.

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. अजिबातच उशीर न करताना अर्ज दाखल करावा. या भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्वाचे अपडेट हे उमेदवारांना साईटवर मिळू शकतील. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची देखील सोपी पद्धत आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.