रेल्वे विभागात तब्बल 1600 हून अधिक जागांसाठी बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी

रेल्वे विभागात मोठी भरती सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये, यामुळे उशीर न करता लगेचच अर्ज करा आणि थेट केंद्र सरकारची नोकरी मिळला. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे देखील अगदी सोपे आहे.

रेल्वे विभागात तब्बल 1600 हून अधिक जागांसाठी बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 2:34 PM

मुंबई : दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी आहे. रेल्वे विभागात ही बंपर भरती निघालीये. तब्बल 1600 पेक्षाही अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. लगेचच अर्ज करा. rrcpryj.org या अधिकृत साइटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही भरती असून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. 14 डिसेंबर 2023 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज हा करावा लागणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) कडून उत्तर मध्य रेल्वेमध्ये ही भरती राबवली जातंय.

हे लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया अपरेंटिस पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी फक्त दहावी पासच नाही तर तुमच्याकडे आयटीआयचे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही अर्ज नाही करू शकत.

रेल्वेची ही भरती प्रक्रिया तब्बल 1664 पदांसाठी होत आहे. विविध विभागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. मॅकेनिकल डिपार्टमेंटमध्ये एकून 364, इलेक्ट्रिकल विभागात एकून 339, झांसी डिवीजनमध्ये एकून 528, आग्रा डिवीजनमध्ये एकून 296 पदे भरली जाणार आहेत. इलेक्ट्रीशियन, फिटर, पेंटर, स्टेनोग्राफर, मॅकेनिक अशा विविध विभागांमधील ही पदसंख्या आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारासाठी वयाची अट ही अत्यंत महत्वाची आहे. कमीत कमी उमेदवाराचे वय 15 तर जास्तीत जास्त 24 वर्षे असणे आवश्यक आहे. यामध्ये फक्त प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये. मार्कनुसार मॅरिट लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर संबंधित उमेदवाराला कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाईल. rrcpryj.org या अधिकृत साइटवर तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती मिळेल.

यानुसार एक फायनल लिस्ट रेल्वे विभागाकडून तयारी केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 100 रूपये फिस भरावी लागणार आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच तुम्हाला तुमचे अर्ज दाखल करावे लागणार आहेत. rrcpryj.org या अधिकृत साइटवर जाऊन अर्ज करा. अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.