कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती, थेट उमेदवाराची होणार मुलाखत पद्धतीने निवड

| Updated on: Dec 01, 2023 | 6:48 PM

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत थेट नोकरी करण्याची मोठी संधी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखत पद्धतीने उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. चला जाणून घ्या ही भरती नेमक्या कोणत्या पदासाठी पार पडतंय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत या पदांसाठी भरती, थेट उमेदवाराची होणार मुलाखत पद्धतीने निवड
Follow us on

मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची परीक्षा देण्याची अजिबातच गरज नाहीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी करण्याची ही खरोखरच संधी म्हणावी लागेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत थेट मुलाखत देऊन नोकरी मिळवा. तब्बल सहा पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही भरती प्रक्रिया राबवतंय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक, सेवानिवृत्त लेखाधिकारी, उपमुख्य लेखा परीक्षक ही पदे भरती प्रक्रियेत भरली जाणार आहेत. याबद्दलची अधिसूचना देखील काढण्यात आलीये. मात्र, जरी भरतीसाठी परीक्षा होणार नसली तरीही उमेदवारांसाठी काही अटी ठेवण्यात आल्यात.

सेवानिवृत्त लेखाधिकारी या पदासाठी संबधित उमेदवाराने कोणत्याही महापालिकेत किंवा नगरपालिकेत किमान पाच वर्षे काम केलेले असावे. सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक या पदासाठी तो उमेदवार शासकीय आणि निमशासकीय सेवेतून व्यवस्थापक म्हणून निवृत्त होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय या पदासाठी तो उमेदवार पात्र नसणार.

उपमुख्य लेखा परीक्षक पदासाठी निमशासकीय, महापालिका किंवा नगरपालिका याठिकाणी किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. लेखा परीक्षण विभागाताच हा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय हे 65 पेक्षा अधिक नसावे हा सर्वात मोठा नियम आहे. या पदांसाठी मुलाखती या 11 डिसेंबर 2023 रोजी घेतल्या जाणार आहेत.

उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच केली जाईल. मुलाखतीचे ठिकाण हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईटला देखील भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळेल.

उमेदवारांना महत्वाची कागदपत्रे घेऊन सकाळी 11पर्यंत मुलाखतीच्या ठिकाणी पोहचावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक अपडेट तुम्ही महापालिकेच्या साईटवर बघू शकता. उमेदवाराने भरती प्रक्रियेला जाताना महत्वाची कागदपत्रे सोबत ठेवावीत.