Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी, तब्बल 26 हजार 146 पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या अधिक

सरकारी नोकरी करण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मात्र, बऱ्याच वेळा जाहिरात येऊन गेल्यावर आपल्या लक्षात येते की, संबंधित विभागात काही जागा निघाल्या होत्या. आता एक मोठी भरती प्रक्रिया ही पार पडतंय. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर आजच अर्ज करा.

सरकारी नोकरी करण्याची हीच 'ती' सुवर्णसंधी, तब्बल 26 हजार 146 पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या अधिक
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 6:13 PM

मुंबई : दहावी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. तब्बल 26 हजारांपेक्षाही अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडतंय. जर तुम्हाला देखील सरकारी नोकरी हवी असेल तर आजच झटपट अर्ज करा. आनंदाची बाब म्हणजे तुम्ही दहावी पास असाल तरीही अर्ज करू शकता. स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) ने एसएससी जीडी भर्ती 2024 ची भरती प्रक्रिया सुरू केलीये. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), रायफलमन (GD) मध्ये कॉन्स्टेबल (GD) आणि आसाम रायफल्ससाठी अर्ज करू शकता. यासोबत इतरही विभागांमध्ये भरपूर जागा आहेत.  तब्बल 26 हजार 146 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

जर आपल्याला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर ssc.nic.in च्या अधिकृत साइटला उमेदवाराने भेट द्यावी आणि अर्ज करावा. ही भरतीची प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 रोजी संपणार आहे. यामुळेच उमेदवाराने त्यापूर्वीच आपला अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2024 आहे.

26 हजार 146 पदांपैकी बीएसएफच्या एकून जागा 6174, सीआयएसएफच्या एकून जागा 11025, सीआरपीएफच्या एकून जागा 3337, एसएसबीच्या एकून जागा 635, आयटीबीपीच्या एकून जागा 3189, एआरच्या एकून जागा 1490, एसएसएफच्या एकून जागा 296 यानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे उमेदवाराने जाणीपूर्वक अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे 10 वी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे. अर्ज करणाऱ्याचे वय 10 ते 23 पर्यंतच असावे. या भरती प्रक्रियेत संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे आयोगाकडून संगणक आधारित परीक्षा ही फक्त हिंदीतच नाही तर इंग्रजी आणि तब्बल 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

या परीक्षेसाठी उमेदवाराला 100 रूपये फिस ठेवण्यात आलीये. यामध्ये काही प्रवर्गाला फिस आकारली जाणार नाहीये. विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने आपण ही परीक्षा फिस भरू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही ssc.nic.in च्या अधिकृत साईटला भेट देऊन शकता. लवकरात लवकर उमेदवाराने आपला अर्ज करावा. या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि फटाफट अर्ज उमेदवारांनी करावा.

पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.