यूको बँकेमध्ये मेगा भरती, परीक्षेचे नो टेन्शन, मोठी संधी, थेट करा अर्ज आणि…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. हक्काची नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. यूको बँकेमध्ये ही मेगा भरती आहे. विशेष: पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.
मुंबई : नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. युनायडेट बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. युनायटेड कमर्शियल बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने होत आहे.
ही भरती प्रक्रिया 142 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची जाहिरात ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. युनायटेड कमर्शियल बँकेकडून या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधून होणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाहीये. परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 21 ते 35 असणे आवश्यक आहे. यूको बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उमेदवारांकडे आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना महाव्यवस्थापक, यूको बँक, मुख्य कार्यालय, एच.आर.एम विभाग, कलकत्ता, पश्चिम बंगाल या पदावर अर्ज पाठवावा लागेल. या पत्यावर अर्ज हे 27 डिसेंबरच्या अगोदर पाठवावे लागतील. 27 डिसेंबर 2023 नंतर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 800 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. परिक्षेसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीनेच करावा लागेल. या अर्जासोबत उमेदवारांना सध्याच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी सुद्धा व्यवस्थित पाठवावा लागेल. चला तर मग अजिबातच उशीर न करता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.