Full time job करूनही UPSC मध्ये पहिल्या प्रयत्नात यश मिळवले, परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवून बनली IAS
UPSC topper: यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी मेडिकल प्रॅक्टिस सोडली होती. आयएएस अधिकारी रेणू राज मुन्नारच्या हिल स्टेशनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि जमीन अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी देखील ओळखल्या जातात.
मुंबई: UPSC नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामुळेच दरवर्षी सुमारे १००० उमेदवारच या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. पण आज आम्ही तुम्हाला एक व्यक्ती आणि आयएएस अधिकारी रेणू राज बद्दल सांगणार आहोत, जी केरळमधील कोट्टायमची रहिवासी आहे आणि तिने ही यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि या नागरी सेवा परीक्षेत दुसरा क्रमांक ही मिळवला.
रेणू राज यांनी यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी मेडिकल प्रॅक्टिस सोडली होती. आयएएस अधिकारी रेणू राज मुन्नारच्या हिल स्टेशनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि जमीन अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी देखील ओळखल्या जातात.
रेणू राज यांचे शालेय शिक्षण केरळमधील कोट्टायम येथील सेंट तेरेसा हायर सेकंडरी स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी कोट्टायमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले. रेणू राज यांचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी असून आई गृहिणी आहे. याशिवाय रेणूला दोन बहिणी असून दोघीही व्यवसायाने डॉक्टर आहेत.
रेणू राज यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, IAS अधिकारी बनणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. जेव्हा ती सर्जन म्हणून काम करत होती, तेव्हा तिला जाणवले की तिला सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करायचे आहे आणि त्यांचे जीवन चांगले करायचे आहे. तेव्हाच तिने आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
“मला वाटलं होतं की एक डॉक्टर म्हणून मी 50 किंवा 100 रुग्णांना मदत करू शकले असते, पण सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर म्हणून माझ्या एका निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होईल. तेव्हाच मी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.