AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AIBE XV Result 2021 : ऑल इंडिया बार एक्सामिनेशन XV चा निकाल घोषित, असा चेक करा निकाल

देशभरातील 50 शहरांमधील 140 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 100 प्रश्नांचा समावेश असलेल्या एआयबीई-XV परीक्षेसाठी उमेदवारांना 3 तासांचा वेळ देण्यात आला होता. (Results of All India Bar Examination XV announced, check on allindiabarexamination.com)

AIBE XV Result 2021 : ऑल इंडिया बार एक्सामिनेशन XV चा निकाल घोषित, असा चेक करा निकाल
ऑल इंडिया बार एक्सामिनेशन XV चा निकाल घोषित
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:41 PM

नवी दिल्ली : बार काऊन्सिल ऑफ इंडियाने मंगळवारी ऑल इंडिया बार एक्सामिनेशन (AIBE) XV परीक्षेचा निकाल घोषित केला आहे. जे उमेदवार परीक्षेस बसले आहेत ते अधिकृत वेबसाईट allindiabarexamination.com वर आपला निकाल तपासू शकतात. (AIBE) XV ची परीक्षा 24 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आली होती. मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात निकाल अपेक्षित होता पण त्यास उशीर झाला होता. बार कौन्सिल ऑफ इंडियाने जानेवारीत एआयबीई एक्सव्हीची उत्तर पत्रिका जाहीर केली होती. (Results of All India Bar Examination XV announced, check on allindiabarexamination.com)

असा तपासा निकाल

– ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (AIBE-XV)चा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट allindiabarexamination.com वर जा. – यानंतर, मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या AIBE-XV निकाल लिंकवर क्लिक करा. – आता आपणास नवीन टॅबवर आणले जाईल. – येथे, उमेदवारांनी आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करावा आणि ते सबमिट करावे. – आता आपला निकाल स्क्रीनवर दिसेल. – उमेदवारांनी त्यांच्या निकालात दिलेला तपशील तपासावा. – आवश्यक असल्यास ते डाउनलोड करा आणि प्रिंट काढा

परीक्षेत 1,20,00 उमेदवारांनी घेतला सहभाग

ऑल इंडिया बार एग्जामिनेशन XV 24 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आली होती. देशभरातील 50 शहरांमधील 140 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 100 प्रश्नांचा समावेश असलेल्या एआयबीई-XV परीक्षेसाठी उमेदवारांना 3 तासांचा वेळ देण्यात आला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या परीक्षेत सुमारे 1,20,000 उमेदवार (अधिवक्ता) सहभागी झाले होते.

तिसऱ्या आठवड्यात जाहीर होणार होता निकाल

तथापि, आधीच्या नोटिशीनुसार AIBE-XVचा निकाल मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात जाहीर होणार होता. मात्र, परिषदेने त्यास आठवड्याभराची मुदतवाढ दिली होती. अधिकृत संकेतस्थळावर सध्या उपलब्ध असलेल्या सूचनेनुसार AIBE-XV निकाल मार्चच्या चौथ्या आठवड्यात जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला.

का महत्त्वाची का परीक्षा?

गेल्या वर्षी 21 मार्च रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती परंतु नंतर कोरोना संक्रमणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. उमेदवारांना भारतात वकिली करण्यासाठी (एआयबीई परीक्षा 2021) ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा लॉ पदवीधर किंवा अंतिम वर्षाचे उमेदवार देऊ शकतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांना काऊन्सिलकडून सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस (सीओपी) मिळते. ज्यानंतर उमेदवार भारतीय न्यायालयात वकिलीचा सराव करू शकतात.

ऑल इंडिया बॉर एग्जामिनेशन ((AIBE-XVI)साठी नोंदणीची उद्या शेवटची तारीख

बार काऊन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) ऑल इंडिया बॉर एग्जामिनेशन ((AIBE-XVI) ची नोंदणी प्रक्रियेची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट allindiabarexamination.com वर जावे लागेल. वेळापत्रकानुसार एआयबीई-XVI चे आयोजन 25 एप्रिल 2021 रोजी करण्यात आले आहे. (Results of All India Bar Examination XV announced, check on allindiabarexamination.com)

इतर बातम्या

1 एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी 5 तास कामाचे आणि पीएफ वाढणार, 10 मुद्द्यांत समजून घ्या केंद्राची योजना

…तर सचिन तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण आंतरराष्ट्रीय सामने खेळूच शकले नसते, वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?.
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.