RRB NTPC Exam: आरआरबी एनटीपीसी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देणार, नोंदणीसाठी लिंक अ‌ॅक्टिव्ह, वाचा सविस्तर

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. आरआरबीन एनटीपीसीनं विद्यार्थ्यांना बँक खात्याचा तपशील सादर करण्याची लिंक सक्रिय केली आहे.

RRB NTPC Exam: आरआरबी एनटीपीसी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देणार, नोंदणीसाठी लिंक अ‌ॅक्टिव्ह, वाचा सविस्तर
भारतीय रेल्वे
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 1:11 PM

नवी दिल्ली: रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. आरआरबीन एनटीपीसीनं विद्यार्थ्यांना बँक खात्याचा तपशील सादर करण्याची लिंक सक्रिय केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आरआरबी सीईएन 01/2019 एनटीपीसी पहिल्या 1 स्टेजमधील कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा दिली होते ते विद्यार्थी परीक्षा फी परत मिळण्यासाठी नोंदणी कर शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र मिळूनही परीक्षा दिली नाही त्यांना फीची रक्कम परत दिली जाणार नाही.(RRB NTPC exam fee refund Link active to submit bank account details check here)

नोंदणी कशी करायची?

आरआरबी एनटीपीसीच्या पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सादर करावा लागेल. उमेदवारांनी बँक खात्याचा तपशिल भरताना काळजी घेण्याची गरज आहे. एकदा विद्यार्थ्यांनी बँक खात्याचा तपशील सबमिट केला की तो बदलता येत नाही. तसेच, बँक खाते वैध असेल त्या खात्यावरचं रक्कम जमा होईल, असं आरआरबीकडून सांगण्यात आलं आहे.

रक्कम मिळण्यास वेळ लागणार

आरआरबी एनटीपीसी परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास काही वेळ लागेल, असं आरआरबी एनटीपीसीकडून स्पष्ट करण्यात आलंय. RRB ने म्हटले आहे की, बँक खात्याचा तपशील सादर करण्यात काही अडचण आल्यास हेल्प ऑप्शनचा वापर करुन आवश्यक ती मदत मिळवू शकता. आरआरबी NTPC कडून परीक्षा शुल्क 500 रुपये घेण्यात आले होते, त्यापैकी 400 रुपये परत देण्यात येणार आहेत.

आरआरबी एनटीपीसी फेज 7 च्या परीक्षा 23, 24, 26 आणि 31 जुलै 2021 रोजी घेण्यात आल्या. NTPC च्या भरतीद्वारे रेल्वे भर्ती मंडळ 35 हजारांहून अधिक पदांची भरती करेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

RRB NTPC Salary: कोणत्या पदाला किती पगार?

ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट- 19,900 रुपये अकाऊंट्स क्लार्क कम टायपिस्ट- 19,900 रुपये ज्युनिअर टाइम कीपर- 19,900 रुपये ट्रैन्स क्लार्क- 19,900 रुपये कमरशिअल कम टिकट क्लार्क- 21,700 रुपये ट्रैफिक असिस्टंट- 25,500 रुपये सीनियर टाईम कीपर- 29,200 रुपये सीनियर कमरशिअल कम टिकट क्लार्क- 29,200 रुपये सीनियर क्लार्क कम टायपिस्ट- 29,200 रुपये ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट- 29,200 रुपये गुड्स गार्ड- 29,200 रुपये स्टेशन मास्टर- 35,400 रुपये कमरशिअल अप्रेंटिस- 35,400 रुपये

इतर बातम्या:

Oil India Recruitment 2021: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ज्युनिअर असिस्टंट पदावर भरती

Jobs News: ESIC मध्ये रेसिडंट ऑफिसर पदावर भरती प्रक्रिया, मुंबई येथे थेट मुलाखतीद्वारे निवड

RRB NTPC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, कोणत्या पदासाठी किती पगार? वाचा सविस्तर

RRB NTPC exam fee refund Link active to submit bank account details check here

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.