RRB NTPC Result : पाटणा येथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, जेहानाबाद स्टेशनवर आंदोलन; पोलिसांचं शांततेचं आवाहन

पाटणा (Patna) येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करण्यात आला आहे. तर गयामध्ये विद्यार्थ्यांनी एका ट्रेनला पेटवून दिलं आहे. त्यानंतर रेल्वे जळत असतानाचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केले आहेत.

RRB NTPC Result : पाटणा येथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, जेहानाबाद स्टेशनवर आंदोलन; पोलिसांचं शांततेचं आवाहन
जेहानाबाद स्टेशनवर विद्यार्थ्यांचं आंदोलन (ANI)
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 2:22 PM

नवी दिल्ली: रेल्वे विभागातील आरआरबी एनटीपीसी (RRB NTPC) सीबीटी परीक्षा 1 निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील (Bihar) विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल आणि सीबीटी परीक्षा ग्रुप डी भाग दोन विरोधात बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पाटणा (Patna) येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करण्यात आला आहे. तर गयामध्ये विद्यार्थ्यांनी एका ट्रेनला पेटवून दिलं आहे. त्यानंतर रेल्वे जळत असतानाचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केले आहेत. दुसरीकडे एसएसपी आदित्य कुमार यांनी विद्यार्थ्यांनी कुणाच्या आवाहनाला बळी पडून नये असं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ती समिती या प्रकरणी चौकशी करेल. काही आंदोलक विद्यार्थ्यांची ओळख पटलेली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आदित्य कुमार म्हणाले. पाटणा येथे झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जहानाबाद स्टेशनवर आंदोल सुरु केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कडेकोट असताना विद्यार्थी तिथं पोहोचले आणि आंदोलन करत आहेत. विद्यार्थी आंदोलनामुळे रेल्वे स्टेशनवर अफरातफरी माजली आहे. पोलीस विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी पाटणा येथे गयावरून जाणाऱ्या 03264 ट्रेनला रोखलं आहे.

समिती स्थापन

निकालावर विचार करण्यासाठी एक समिती दाखल करण्यात आली आहे. या समितीत उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण जालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या आक्षेंपावर विचारविनिमय करण्यात येईल त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.आरआबी एनटीपीसी निकालाविरोधात लाखो विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी रेल्वे स्टेशनवर आंदोलन केलं होतं.

आरा स्टेशनवरील इंजिन पेटवलं

संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळील एका पॅसेंजर ट्रेनमध्ये आग लावली. विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनवरील पश्चिम गुमटी जवळ उभ्या असलेल्या सासाराम आरा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आग लावली, . त्यानंतर लोको पायलट रवि कुमारनं इंजिनला इतर डब्यांपासून वेगळं केलं आणि त्यानंतर स्वत: चा जीव वाचवण्यासाठी इंजिनमधून उडी मारली. लोको पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वेचं इंजिन जळून खाक झालं आहे.

इतर बातम्या:

RRB NTPC परीक्षा प्रक्रिया स्थगित, आरआरबीकडून समितीची स्थापना, विद्यार्थ्यांचं आंदोलन थाबंणार?

MPSC Exam : हायकोर्टाच्या आदेशानं 86 जणांसाठी प्रक्रिया जाहीर, इतर विद्यार्थीही आक्रमक, कपिल पाटील यांचे एमपीएससीला पत्र

RRB NTPC Result Demonstration in Jehanabad against lathi charge on students in Patna protesters stalled train operations train burn at Gaya station

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.