सातारा जिल्हा परिषदेत योग शिक्षकांची भरती, 95 जागांसाठी अर्ज करण्याचं आवाहन

| Updated on: Dec 03, 2021 | 7:00 AM

सातारा जिल्हा परिषदेनं (Satara ZP) राष्ट्रीय आरोग्य मिशन (National Health Mission) अंतर्गत योग शिक्षक (Yoga Teacher) पदांच्या 95 जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

सातारा जिल्हा परिषदेत योग शिक्षकांची भरती,  95 जागांसाठी अर्ज करण्याचं आवाहन
सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर
Follow us on

सातारा: सातारा जिल्हा परिषदेनं (Satara ZP) राष्ट्रीय आरोग्य मिशन (National Health Mission) अंतर्गत योग शिक्षक (Yoga Teacher) पदांच्या 95 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. सातारा जिल्हा परिषदेनं 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत या पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर अर्ज मागवण्यात आले आहेत. https://nhmsatararecruitment.com या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातारा जिल्ह्यात नोकरी करावी लागेल.

पात्रता:

सातारा जिल्हा परिषदेच्या योग शिक्षक पदासाठी वायसीबी प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1, योग प्रशिक्षक, वायसीबी प्रमाणित व्यावसायिक स्तर -2, योग शिक्षक, योग थेरेपी, पी.जी.डी योग शिक्षण डिप्लोमा आणि योगामध्ये बीए किंवा एमए झालेले उमेदवार या पदासांठी अर्ज दाखल करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्जाचं शुल्क 300 रुपये सादर करावं लागणार आहे.

जबाबदारी

योग प्रशिक्षक म्हणून निवड करताना प्रकल्प कृती आराखडा सन 2021-22 च्या अन्वये 31 मार्च 2022 पर्यंत कंत्राटी नियुक्ती केली जाणार आहे. योग प्रशिक्षकाला प्रत्येक आठवड्यात कार्यरत उपकेंद्र, प्रा. आ. केंद्र व आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एक शिबीर आयोजित करायचे आहे. प्रत्येक शिबिरामागे प्रत्येक योग शिक्षकाला 500 रुपये मानधन प्रा.आ. केंद्र स्तरावरुन शिबिरांच्या संख्येनुसार दिले जाणार आहे. एका योग शिक्षकाला एका संस्थेत महिन्यात अधिकतम 08 शिबिरे घेण्यास परवानगी आहे. 8 शिबिरांपेक्षा जास्त शिबिरे घेता येणार नाही.

निवड प्रक्रिया

उमेदवारांना एकदा दिलेल्या कंत्राटी नियुक्ती आदेशामध्ये कोणत्याही प्रकारे बदली दिली जाणार नाही व त्याबाबत कोणत्याही पदाधिकाऱ्यांमार्फत शिफारस करु नये, असं सातारा जिल्हा परिषदेकडून कळवण्यात आलं आहे.

भरती प्रक्रियेमध्ये पुढीलप्रमाणे मेरिट ठरवलं जाणार

1. योगा डिग्री असलेस 10 मार्क

2. योगा डिप्लोमा असलेस 10 मार्क

3. शासकीय व निमशासकीय संस्था अनुभव असलेस 10 मार्क

4. इतर गुण प्रात्यक्षिक व मुलाखतीद्वारे दिले जातील.

इतर बातम्या

CBSE : गुजरातमध्ये कोणत्या सरकारच्या काळात 2002 मध्ये मुस्लीम विरोधी हिंसा झाली? वादग्रस्त प्रश्नावर सीबीएसईचा माफिनामा

IIT मध्ये कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात, पहिल्याच दिवशी आयआटी मुंबईच्या विद्यार्थ्याला 2 कोटींचं पॅकेज

 

Satara ZP invites application for 95 Yoga Teacher under National health Mission