Maharashtra SET 2021 Admit Card : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सहायक प्राध्यापक पदासाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे.

Maharashtra SET 2021 Admit Card : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, 'या' दिवशी परीक्षा
SPPU SET Exam
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 11:02 AM

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सहायक प्राध्यापक पदासाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवार 26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येईल. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र https://setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

सेट परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचं?

स्टेप 1: अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम setexam.unipune.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी स्टेप 2 : होमपेजवरील डाऊनलोड अ‌ॅडमिट कार्ड बाय लॉगिन अ‌ॅप्लिकेश नंबर स्टुडंट नेम या पर्यायावर क्लिक करा स्टेप 3 : नवीन विंडो होमपेजवर ओपन होईल, तिथं विद्यार्थ्यांनी लॉगिन डिटेल्स भराव्यात स्टेप 4 : यानंतर प्रवेशपत्र दिसेल ते डाऊनलोड करुन त्यांची प्रिंट आऊट सोबत ठेवावी

कोरोना नियमांचं पालन करत परीक्षा

सेट परीक्षेसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना परीक्षाकेंद्र देण्यात आली आहेत. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचं आयोजन करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क घालावा लागेल. याशिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचं पालनं करावं लागेल, सॅनिटायझर देखील वापरावा लागेल.

किती परीक्षार्थींची नोंदणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्यावतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या 37 व्या सेट परीक्षेसाठी 98360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सेट विभागाकडून विद्यार्थ्यांच्या नावाची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होत असून ओएमआर उत्तरपत्रिकेवर उत्तर नोंदवावी लागणार आहेत. सेट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नमुना उत्तर पत्रिका पाहायला मिळेल.

परीक्षेचं स्वरुप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी 37 वी सेट परीक्षेसाठी दोन पेपर निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या पेपरमध्ये अध्ययय अध्यापन कौशल्य, संशोधन क्षमता, तार्किक क्षमता, सामान्य ज्ञान यासंबंधी प्रश्न विचारले जातील. दुसऱ्या पेपरमध्ये संबंधित विषयासंबंधी प्रश्न विचारले जातील.

अकरावी प्रवेशाची विशेष फेरी सुरु

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीच्या प्रवेशाची मुदत संपली असून आता विशेष फेरीअंतर्गत महाविद्यालयीन कोट्यातून प्रवेश सुरु होतील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. नियमित फेरीअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 2 लाख 14 हजार 806 विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतला आहे. विशेष फेरीचे प्रवेश 25 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी विशेष फेरीअंतर्गत प्रवेश घ्यावेत, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

इतर बातम्या:

FYJC Admission : अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण, विशेष फेरीअंतर्गत प्रवेश ‘या’ तारखेपर्यंत सुरु राहणार, वर्षा गायकवाड यांचं ट्विट

उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन, मोफत गॅस कसा मिळवाल?

Savitribai Phule Pune University released Maharashtra SET 2021 Admit Card on setexam.unipune.ac.in

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.