SBI Clerk Prelims Exam 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लार्क भरती परीक्षा स्थगित, कोणत्या केंद्रांवरील परीक्षा लांबणीवर?

स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनिअर असोसिएट 2021 पूर्व परीक्षेला (SBI Clerk Prelims Exam 2021) बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात पुढील माहितीसाठी सातत्यानं वेबसाईटला भेट द्यावी.

SBI Clerk Prelims Exam 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लार्क भरती परीक्षा स्थगित, कोणत्या केंद्रांवरील परीक्षा लांबणीवर?
एसबीआय
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:35 AM

SBI Clerk Prelims Exam 2021 नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियानं ज्युनिअर असोसिएट पदासाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेबद्दल एक महत्वाचं नोटीस जारी केलं आहे. या नोटीस नुसार शिलाँग, आगरताळा, महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक येथील परीक्षा केंद्रावर होणारी ज्युनिअर असोसिएट पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. संबंधित परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पुढील सूचना जारी होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनिअर असोसिएट 2021 पूर्व परीक्षेला (SBI Clerk Prelims Exam 2021) बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात पुढील माहितीसाठी सातत्यानं वेबसाईटला भेट द्यावी. स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनिअर असोसिएटच्या 5000 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 27 एप्रिल 2021 पासून सुरुवात झाली होती. 20 मे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक होता. जुलै महिन्यात या पदासाठीच्या पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.

पुन्हा परीक्षा कधी?

स्टेट बँक ऑफ इंडियानं काही कारणामुंळे शिलाँग, आगरताळा, महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक येथील 10 ते 13 जुलै रोजी होणारी ज्युनिअर असोसिएट पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर होणाऱ्या परीक्षांसाठी नवीन तारखा नंतर जारी केल्या जाणार आहेत. संबंधित परीक्षा केंद्रावर जे विद्यार्थी परीक्षा देणार होते त्यांना मोबाईल आणि ईमेल द्वारे कळवण्यात आलं आहे.

एसबीआई क्लार्क परीक्षा 2021

भारतीय स्टेट बँक ज्युनिअर असोसिएट पदासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी दरवर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क पदासाठी परीक्षा आयोजित केली जाते. स्टेट बँक ऑफ इंडीया क्लार्क भरती परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमदेवार मुख्य परीक्षा देतात. दोन्ही परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमदेवारांना बँकेत नियुक्ती केली जाते. एसबीआय क्लार्क परीक्षेसाठी मुलाखत घेतली जात नाही.

परीक्षेचं स्वरुप

स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्व परीक्षेसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा 100 गुणांसाठी घेतली जाते. यामध्ये 30 प्रश्न इंग्रजी भाषा कौशल्य, क्वांटिटेटिव्ह अ‌ॅप्टिट्यूडसाठी 35 प्रश्न आणि रिझनिंग अ‌ॅबिलिटी साठी 35 प्रश्न विचारले जाजात. तर परीक्षेसाठी 1 तास वेळ निर्धारित केलेला असतो.

संबंधित बातम्या:

GAIL Recruitment 2021: गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये 220 सरकारी नोकर्‍या; 5 ऑगस्टपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगानं प्रिन्सिपलच्या 363 पदांवर काढली भरती, upsc.gov.in वर करा अर्ज

SBI Clerk Prelims Exam 2021 Postponed for various Exam Centers in Maharashtra and Eastern Parts of India Know about exam details

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.